मालेगावी ७२१ सदोष पोलिओ लस सिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:06 PM2018-10-02T18:06:05+5:302018-10-02T18:09:08+5:30
मालेगाव : गेल्या काही महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेत दिलेली लस सदोष आढळून आलेली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने गंभीर दखल घेतली असून शासनाच्या पत्रान्वये येथील ७२१ पोलिओ लसचे डोस जप्त करण्यात आले.
मालेगाव : गेल्या काही महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेत दिलेली लस सदोष आढळून आलेली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने गंभीर दखल घेतली असून शासनाच्या पत्रान्वये येथील ७२१ पोलिओ लसचे डोस जप्त करण्यात आले.
यापूर्वी झालेल्या व होणाऱ्या लसीकरण मोहिमेपासून बालकांना कुठल्याही प्रकारचा धोका होणार नसल्याची माहिती सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, जागतिक आरोग्य संघटनेचे मो. अब्दूल हलीम अझहर व डॉ. मिसम अब्बास यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत घेण्यात येणारी पी-२ लस सन २०१६ पासून बंद करण्यात आली होती. या लसीची गरज नसल्यामुळे आरोग्य विभागाने लस देणे बंद केले होते; मात्र गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आलेली पी-२ ची लस बायोमेड कंपनीकडून महाराष्टÑ, उत्तरप्रदेश, तेलंगणा राज्यात पुरवठा करण्यात आली होती. सदर लस ही सदोष असल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने १० सप्टेंबर २०१८ रोजी येथील सामान्य रूग्णालयाला पत्र दिले होते. बंदी असलेल्या लसीचा वापर करू नये, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सामान्य रूग्णालयात असलेल्या ७२१ व्हाईल जप्त करण्यात आल्या आहेत. एका व्हाईलमधून १७ बालकांना डोस दिला जातो. यापूर्वी देण्यात आलेल्या डोसमुळे बालकांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही. नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन डॉ. किशोर डांगे यांनी केले आहे.