मालेगावी ९४ उमेदवार रिंगणात
By admin | Published: February 14, 2017 12:00 AM2017-02-14T00:00:13+5:302017-02-14T00:00:48+5:30
लढती रंगणार : गटांतून २१, तर गणांतून ३५ उमेदवारांची माघार
मालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद गटांच्या सात जागांसाठी ३१, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ६३ असे एकूण ९४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. गटांतून २१, तर गणांतून ३५ अशा एकूण ५६ इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली आहे. आज येथील प्रांत कार्यालयात रिंगणातील उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. आजपासून प्रचाराला ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
मालेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे ७ गट व पंचायत समितीचे १४ गण आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत गटांसाठी ५६, तर गणांसाठी १०५ नामांकन अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर आज येथील प्रांत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुरेश कोळी उपस्थित होते. माघारीची प्रक्रिया पार पडली. इच्छुक उमेदवारांनी गटांत व गणांतील इतर इच्छुकांची मनधरणी करीत माघारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. काही ठिकाणी ‘लक्ष्मीदर्शन’ होऊन माघारीचे सोपस्कार पार पडल्याचे दिसून आले. आज सकाळी ११ वाजेपासून माघारीची प्रक्रिया सुरू झाली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची अंतिम वेळ होती. या वेळेत गटातून २१ जणांनी, तर गणातून ३५ अशा एकूण ५६ इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता गटांतील ७ जागांसाठी ३१, तर गणांच्या १४ जागांसाठी ६३ असे एकूण ९४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
रावळगाव, दाभाडी, निमगाव, सौंदाणे या चारही गटांत कॉँग्रेसने उमेदवार न दिल्यामुळे येथे तिरंगी लढत होत आहे, तर गणात कॉँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. त्यामुळे कॉँग्रेसने वडनेर, डोंगराळे, रावळगाव गणांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. गट व गणांत भाजपा व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. भाजपा, शिवसेनेला अपक्ष उमेदवार डोकेदुखी ठरणार आहेत. निमगाव गटात चौरंगी लढत होत आहे. निमगाव गट विकास आघाडीनेही स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी यांबरोबरच निमगाव गट विकास आघाडीचेही उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
माघारीच्या प्रक्रियेनंतर गणातील उमेदवारांची नावे (कंसात पक्षचिन्ह व पक्षाचे नाव) पुढीलप्रमाणे- वडनेर- सरला खैरनार (कमळ), सुरेखा ठाकरे (धनुष्यबाण), हेमलता पाटील (हाताचा पंजा), निर्मलाबाई वाघ (शिटी). करंजगव्हाण- रावसाहेब निकम (शिटी), परमेश्वर भामरे (घड्याळ), भगवान मालपुरे (धनुष्यबाण), सोमनाथ वडगे (कमळ). डोंगराळे- म्हाळसाबाई ठाकरे (कपबशी), सारजा तलवारे (हाताचा पंजा), बकूबाई पवार (धनुष्यबाण), वंदना बोरसे (कमळ), शेवंताबाई सोनवणे (शिटी). झोडगे- पुष्पा इंगळे (इस्त्री), कमल देसले (शिटी), विजया देसले (धनुष्यबाण), सुवर्णा देसाई (कमळ). कळवाडी- शंकर बोरसे (धनुष्यबाण), गोविंदा बोराळे (हत्ती), नाना बोराळे (कपाट), कल्पना मोहन (घड्याळ), सचिन वाघ (कमळ). चिखलओहोळ- राधाबाई पवार (घड्याळ), बेबीबाई पिंजन (कमळ), सरला शेळके (धनुष्यबाण), वंदना सूर्यवंशी (कपबशी). वडेल- काशीनाथ वाघदरे (कपबशी), नंदलाल शिरोळे (कमळ), महादू सोनवणे (धनुष्यबाण). रावळगाव- भुरा गायकवाड (नारळ), बापू पवार (कमळ), अर्जुन सोनवणे (कपबशी), निवृत्ती सोनवणे (गॅस सिलिंडर), वेणू सोनवणे (बॅट), शांताबाई सोनवणे (हाताचा पंजा), सारिका सोनवणे (धनुष्यबाण). दाभाडी- द्वारकाबाई गायकवाड (घड्याळ), मनीषा माळी (धनुष्यबाण), कमळाबाई मोरे (कमळ), सुनंदा सोनवणे (कपाट). पाटणे- मुरलीधर खैरनार (नारळ), राजेंद्र खैरनार (घड्याळ), अरुण पाटील (कमळ), कैलास बागुल (बॅट), नंदलाल शेवाळे (धनुष्यबाण). चंदनपुरी- रोहिणी अहिरे (धनुष्यबाण), मनीषा कदम (गॅस सिलिंडर), कल्पनाबाई पवार (कपबशी), अंजनाबाई शेलार (कमळ), प्रतिभा सूर्यवंशी (घड्याळ). निमगाव- दीपक अहिरे (कमळ), अनिल तेजा (कपबशी), अशोक शेवाळे (धनुष्यबाण), समाधान शेवाळे (घड्याळ). सौंदाणे- अलका पवार (हाताचा पंजा), संगीता वाघ (कमळ), मनीषा सोनवणे (धनुष्यबाण). जळगाव- गणेश खैरनार (कमळ), वसंत दुकळे (घड्याळ), योगेश निकम (कपबशी), शांतीलाल पवार (धनुष्यबाण). (वार्ताहर)