मालेगावी दिव्यांगांची फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 05:46 PM2018-12-03T17:46:33+5:302018-12-03T17:47:06+5:30
मालेगाव : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून शहरातील दिव्यांगांनी फेरी काढली होती. समाजाला स्वच्छतेचे महत्व पटावे यासाठी दिव्यांगांनी हातात झाडू घेवून साफसफाई केली.
मालेगाव : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून शहरातील दिव्यांगांनी फेरी काढली होती. समाजाला स्वच्छतेचे महत्व पटावे यासाठी दिव्यांगांनी हातात झाडू घेवून साफसफाई केली. शासनाने दिव्यांगांना विविध सवलती द्याव्यात. महापालिकेने दिव्यागांसाठी असलेला ३ टक्के निधी खर्च करावा या मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे यांना प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पदाधिकारी व दिव्यांगांनी दिले. महसूल विभागाच्या वतीने दिव्यागांचा सत्कार करण्यात आला.
शहरातील दिव्यागांनी सोमवारी फेरी काढली होती. येथील मोसमपुलावरील महात्मा गांधी पुतळ्यापासून फेरीला सुरूवात झाली. फेरी कॅम्परोड मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी दिव्यागांनी कॅम्प रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबविली. तसेच महापालिकेने दिव्यांगांचा ३ टक्के निधी खर्च करावा. शासनाने दिव्यागांना सवलती पुरवाव्यात आदि मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी मोरे यांना देण्यात आले. यानंतर तहसील कार्यालयातील सभागृहात दिव्यागांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी, तहसीलदार देवरे, नायब तहसीलदार जगदीश निकम आदिंसह अधिकारी, दिव्यांग उपस्थित होते.