मालेगावी मेहुण्याने केला शालकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 04:32 PM2018-12-28T16:32:13+5:302018-12-28T16:32:30+5:30
मालेगाव : माहेरी असलेल्या पत्नीला नांदवायला पाठविण्यास सासरचे लोक विरोध करीत असल्याचा राग येऊन चुलत शालक मोहंमद अल्ताफ मो. अन्वर (१५), रा. जाफरनगर याचे अपहरण करून त्याचा दोरीने गळा आवळून खून करणाऱ्या संशयित मेहुणा मोहंमद कासीम (२७), रा. अख्तराबाद यास व त्याच्या साथिदाराला पवारवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
मालेगाव : माहेरी असलेल्या पत्नीला नांदवायला पाठविण्यास सासरचे लोक विरोध करीत असल्याचा राग येऊन चुलत शालक मोहंमद अल्ताफ मो. अन्वर (१५), रा. जाफरनगर याचे अपहरण करून त्याचा दोरीने गळा आवळून खून करणाऱ्या संशयित मेहुणा मोहंमद कासीम (२७), रा. अख्तराबाद यास व त्याच्या साथिदाराला पवारवाडी पोलिसांनी अटक केली आहे. संशयित कासीम विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी खुनाचा प्रकार उघडकीस आला. मोहंमद कासीम पत्नीला मारहाण व शिवीगाळ करीत होता. नवरा काही कामधंदा करीत नसल्याने त्याची पत्नी माहेरी आली होती. तिच्या कुटुंबीयांनी नांदवायला पाठविण्यास विरोध केला होता. याचा राग मनात धरून मोहंमद कासीम याने चुलत शालक मोहंमद अल्ताफ मो. अन्वर याचे गुरुवारी अपहरण केले. मो. अल्ताफ याच्या कुटुंबीयाने त्याचा शोध घेतला. तो मिळून न आल्याने पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. यावेळी संशयित कासीम हादेखील शोध घेण्यास मदत करीत होता. शुक्रवारी सकाळी मो. अल्ताफ याचा मृतदेह पवारवाडी भागातील ओवाडी नाल्यात आढळून आला. पोलिसांनी मृतदेह येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. मो. अल्ताफ याचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले. पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. मो. अल्ताफ यांच्या कुटुंबीयांनी मो. कासीम याच्यावर संशय व्यक्त केला होता. मो. कासीम याला पोलिसी खाक्या दाखविताच, अपहरण करून खून केल्याची कबुली त्याने दिली. या कामात त्याला मदत करणाºया एका संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास निरीक्षक पाटील करीत आहेत.