मालेगावी शिवसेनेचे जोडा मारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 07:15 PM2018-09-06T19:15:58+5:302018-09-06T19:16:38+5:30
भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ येथील शहर शिवसेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आमदार कदम व आमदार आराफत शेख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडा मारो आंदोलन केले. यानंतर कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी छावणी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलीस अधिकाºयांनी याबाबत कायदेशीर माहिती घेवून गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
३ सप्टेंबर रोजी दहीहंडीच्या कार्यक्रमात कदम यांनी महिला व मुलींबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेने गुरूवारी आंदोलन केले. येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला महिला पदाधिकाºयांनी जोडे मारुन आंदोलन केले. छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रमोद शुक्ला, महानगर प्रमुख रामा मिस्तरी, मकबूल शेख, गोविंद गवळी, सुनील चांगरे, राजेश गंगावणे, प्रविण देसले, यशपाल बागूल, भारत बेद, महिला आघाडीच्या संगीता चव्हाण, नगरसेविका ज्योती भोसले, आशा अहिरे, छाया शेवाळे, आशा जाधव, मनिषा जाधव, शोभा धुमाळ, पुजा गंगावणे, सोनाली धात्रक, कविता खैरनार, सुनिता मिस्तरी, सुनिता देसले, अरुणा चौधरी आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.