मालेगावी टोळक्याचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 10:43 PM2019-02-02T22:43:08+5:302019-02-02T22:43:40+5:30
मालेगाव मध्य : शहरातील पूर्वभागात दहा ते पंधरा गुंडांच्या टोळक्याने शुक्रवारी रात्री पूर्व वैमनस्यातून चॉपर, कोयते घेत विविध भागात धुडगूस घालत पाच जणांवर प्राणघातक हल्ला केला व वाहनांची तोडफोड केली. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून, दोन किरकोळ जखमी आहेत. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. हल्ल्यातील जखमी मोहंमद आबीद मोहंमद जाबीर याने पवारवाडी पोलिसात फिर्याद दिल्याने याप्रकरणी पोलिसांनी पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करीत तिघांना ताब्यात घेतले आहे.
मालेगाव मध्य : शहरातील पूर्वभागात दहा ते पंधरा गुंडांच्या टोळक्याने शुक्रवारी रात्री पूर्व वैमनस्यातून चॉपर, कोयते घेत विविध भागात धुडगूस घालत पाच जणांवर प्राणघातक हल्ला केला व वाहनांची तोडफोड केली. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून, दोन किरकोळ जखमी आहेत. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. हल्ल्यातील जखमी मोहंमद आबीद मोहंमद जाबीर याने पवारवाडी पोलिसात फिर्याद दिल्याने याप्रकरणी पोलिसांनी पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करीत तिघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मोहंमद आबीद मो. जाबीर याच्या भावाने पोलिसात दिलेली फिर्याद मागे घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून संशयित आरोपी आरीफ कुरेशी, ताहीर जमाल अन्सारी, मोहंमद कुरेशी, मोहंमद सलमान व त्यांच्या दहा साथीदारांनी मिल्लत मदरशाच्या पाठीमागील लुम कारखान्यात अनाधिकृतरीत्या प्रवेश करून तलवार, चॉपर, कोयते व लाकडी दांडक्याने दमदाटी करून मारहाण केली. त्यात मोहंमद आबीद मोहंमद जाबीर (३३) रा. बाग-ए-कासिम याच्या डोक्यावर, हाताच्या दोन बोटांवर गंभीर मार लागला तर सोबत असलेल्या फय्याज अहमद नियाज अहमद, रा. गोल्डननगर याच्या डोक्यावर, पाठीवर व हाताला मार लागला. त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच टोळक्याने जाफरनगर येथेही बिस्मिल्ला हॉटेल चौकात हॉटेलच्या सामानाची नासधूस करीत रिक्षा व इंडिगो कारच्या (क्र. एमएच ०४ डीजे ३०८८) काचा फोडल्या. बारदान नगर, नवी वस्ती येथील सुलभ शौचालयाचे कामगार पवन संतोष पवार (२२) रा. कलेक्टरपट्टा, सोहेल अंजुम मोहंमद यासीन (१९) रा. फार्मसीनगर यांना मारहाण केल्याने किरकोळ जखमी झाले.
याच टोळक्याने आयेशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स.नं. ७१ नॅशनल सायझिंग समोरील मनपा शाळेच्या आवारात दोन जणांवर हल्ला केला. सुदैवाने हारुण खान अय्युब खान याने पळ काढळ्याने तो बचावला मात्र त्याचा साथीदार अतिक खान अलीयार खान (४०) रा. महेवीनगर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्लेखोर गुंडांनी हल्ले करून दुचाकीवरून पळ काढला. त्यानंतर नागरिकांची सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्याने परिसरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सदर घटनेत एका ठिकाणी गोळीबारही झाल्याचे हल्ल्यातून बचावलेल्या हारुण खान यांनी सांगितले. मात्र पोलिसांकडून दुजोरा मिळू शकला नाही.
जखमी मोहंमद आबीद मोहंमद जाबीर याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरीफ कुरेशी, ताहीर जमाल अन्सारी, मोहंमद कुरेशी रा. नयापुरा, एजाज शफीक उल्लाह ऊर्फ एजाज नाट्या, मथन चोरवा, सऊद, नरु चोरवा (पूर्ण नाव माहीत नाही), अनिस बादशाह यांच्यासह अनोळखी इसमांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. सकाळी मोहंमद शमीम मोहंमद सलीम अन्सारी (२४) ऊर्फ लाडू रा. मिल्लतनगर, अनिस अहमद रफीक अहमद (२६) ऊर्फ अनिस बादशाह व एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. फय्याज अहमद नियाज अहमदआयेशानगर भागात झालेल्या हल्ल्यातून बचावलेला हारुण खान अय्युब खान याच्यावर सुमारे चार महिन्यांपूर्वीच पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीवघेणा हल्ला झाला होता. यात काही जणांना अटक करण्यात आली होती. मात्र संशयित ताहीर हा तेव्हापासून फरार होता. सुमारे तीन चार दिवसांपूर्वी हारुण खान यास भ्रमणध्वनीवरून आमच्या विरोधातील पोलिसातील तक्रार मागे घे नाही तर पाहून घेऊ, असा फोन आला होता.