मालेगावी ९३ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 08:43 PM2020-04-22T20:43:25+5:302020-04-23T00:21:58+5:30
मालेगाव : शहरातील कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, मंगळवारी रात्री तपासणी अहवाल आल्यानंतर त्यात आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने शहरातील रुग्णसंख्या आता ९३ झाली आहे, तर त्यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
मालेगाव : शहरातील कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, मंगळवारी रात्री तपासणी अहवाल आल्यानंतर त्यात आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने शहरातील रुग्णसंख्या आता ९३ झाली आहे, तर त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील नागरिकांची घबराट वाढली असून, रोज येणाऱ्या अहवालाकडे लक्ष लागून आहे. ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत ते भाग सील करण्यात आले आहेत. ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मालेगाव शहरातील सामान्य रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी बंद करण्यात आली आहे. शहरासह तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणू नये, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ . किशोर डांगे यांनी केले आहे. सामान्य रुग्णालयात आता सर्वसाधारण रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. कोरोना रुग्णांची तपासणी आणि उपचार आता जीवन, मन्सुरा
आणि नवीन फारान हॉस्पिटलमध्ये केले जातील, असे डॉ. डांगे यांनी सांगितले.
---------
१६९ जणांवर कारवाई
लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर पोलिसांनी पॉइंट लावून रस्ते अडविले होते. विनाकारण फिरणाºया आणि सोशल डिस्टन्स न पाळणाºया १६९ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यात विनाकारण बाहेर फिरणाºया आणि लॉकडाउन काळात दुकान उघडणाऱ्यांचा समावेश आहे. यात आस्थापना ५१, संचारबंदी मोडून फिरणारे २६ , दूधविक्रेते १३, मेडिकल दुकानात सोशल डिस्टन्स न ठेवणारे सहा आणि गॅस एजन्सीसमोर सोशल डिस्टन्स न ठेवणाºया एकाचा समावेश आहे. मोमीनपुरा, कमालपुरा आणि कुंभारवाडा या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवून कठोर कारवाई सुरू केली आहे. दरम्यान १६ वाहने जप्त करण्यात आले आहेत.