मालेगावी आता मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:14 AM2020-12-06T04:14:49+5:302020-12-06T04:14:49+5:30
नुकतेच शासनाच्या निर्देशानुसार विविध प्रार्थना स्थळे खुली करण्यात आली असली तरी, त्या ठिकाणी शासनाच्या नियम व अटींचे पालन होणे ...
नुकतेच शासनाच्या निर्देशानुसार विविध प्रार्थना स्थळे खुली करण्यात आली असली तरी, त्या ठिकाणी शासनाच्या नियम व अटींचे पालन होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या सुरुवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या शहरातील नागरिकांनी आरोग्य प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास वेळोवेळी सहकार्य केले आहे. यापुढे येणाऱ्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी व कोरोनाची संभाव्य दुसरी लाट थोपविण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास कोरोना संसर्ग नियंत्रणात येऊ शकतो. परंतु, तसे होत नसल्याने आता नियमांची अंमलबजावणी कठोरपणे केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क बंधनकारक करताना बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही अपर पोलीस अधीक्षक खांडवी यांनी सांगितले आहे.
इन्फो
अन्यथा गुन्हे दाखल करणार
कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी मास्क वापरा, असं आवाहन राज्य सरकार वारंवार करत आहे. मात्र, नागरिक नियमांचं पालन करत नसल्याचं दिसत आहे. दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थान येथे कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाची संभाव्य दुसरी लाट येण्याचे संकेत मिळत आहे. काही प्रमाणात आता रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कामानिमित्तच बाहेर पडावे, शासनामार्फत देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. काही नागरिक हे हलगर्जीपणा करताना दिसत आहेत. त्यामुळे आता अशा बेजबाबदार नागरिकांवर पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही अपर पोलीस अधीक्षक खांडवी यांनी नमूद केले आहे.