मालेगावी रात्री दहानंतर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:20+5:302020-12-31T04:16:20+5:30

मालेगाव (शफीक शेख) : राज्यात सर्वत्र रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आल्याने सर्वच शहरांमध्ये ...

In Malegaon, after ten o'clock at night, Shukshukat | मालेगावी रात्री दहानंतर शुकशुकाट

मालेगावी रात्री दहानंतर शुकशुकाट

Next

मालेगाव (शफीक शेख) : राज्यात सर्वत्र रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आल्याने सर्वच शहरांमध्ये रात्री शुकशुकाट दिसत आहे. मालेगाव शहरातही रात्री १० वाजेनंतरच शुकशुकाट जाणवत असून, दिवसरात्र लोकांच्या गर्दीने भरभरून वाहणारे रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे दिसून आले.

एव्हाना शहरात सायंकाळी ८ ते १० वाजेदरम्यान किदवाई रोड, नवीन बस स्थानक, जुना आग्रा रोड भागात हॉटेल्सवर चहा घेण्यासाठी प्रचंड गर्दी दिसून येते. मात्र, संचारबंदी आदेश लागू झाल्यानंतर शहरात आदेशाचे तंतोतंत पालन केले जात आहे. शहरात पोलीस गस्त वाढविण्यात आल्याने कुठेही जमाव दिसून आला नाही. अत्यावश्यक कामांसाठी रुग्णालयात आजारी माणसांना नेण्याचा अपवाद वगळता कुठेही कुणी फिरताना दिसत नाही. त्यात थंडीचा कडाका वाढल्यामुळे लोक सायंकाळनंतरच घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे तशी सायंकाळनंतरच संचारबंदी सदृश्य परिस्थिती शहरात निर्माण होत आहे. रात्री दहा-साडे दहा वाजेनंतरच शहरातील हॉटेल्स बंद होत असून, दैनंदिन व्यवहार ठप्प होत आहेत. बस स्थानकावर बाहेरगावाहून आलेले नागरिक थंडीत कुडकुडत रात्र कशीबशी काढून दुसऱ्या दिवशी बसने आपापल्या गावाकडे मार्गस्थ होताना दिसून आले. शहराच्या पश्चिम भागात मालेगाव कॅम्प, मोतीबाग नाका, मोसमपूल, एकात्मता चौक, सटाणा रोड हा परिसर रात्री दहा वाजेनंतरच सामसूम होत आहे. त्यामुळे दुकानदारांना आपले व्यवहार लवकर आटोपते घ्यावे लागत आहेत.

-------------------

रात्रभर जागणारे गाव अशी ओळख असलेल्या मालेगावातील यंत्रमागाचा खडखडाट मात्र रात्रभर सुरू आहे. यंत्रमाग कामगारांना रात्री १२ ते पहाटे पाच वाजेदरम्यान शहरात चहा घेण्यासाठी जायची सवय आहे. मात्र, संचारबंदी आदेशामुळे त्यांची कोंडी झाली आहे. शहरातील गल्लीबोळात सुरू असलेल्या यंत्रमाग कामगारांना मात्र गल्लीबाेळात फिरताना काही ‘अडचण’ येत नसल्याचे दिसून आले. पूर्व भागातील किदवाई रोड, मोहंमद अली रोड, गूळ बाजार, नंदन टॉवर भागात रात्री नेहमीच वर्दळ असते. मात्र, संचारबंदीमुळे रात्री पोलीस गस्त लावण्यात आल्याने नागरिक घराबाहेर पडत नसल्याने हा भागही सुना पडला आहे. रिक्षा आणि दुचाकीधारक रात्री घराबाहेर पडताना दिसत नसल्याने युद्ध सदृश्य परिस्थितीचे दर्शन होते. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. एव्हाना पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याने मोसम पुलापासून दरेगाव चौफुलीपर्यंत पोलीस वाहने फिरताना दिसत आहेत. औषध दुकाने, रुग्णालये आणि अत्यावश्यकसेवा मात्र सुरू आहेत. शहरातील नागरिकही आपले दैनंदिन व्यवहार सकाळीच आटोपून घेताना दिसत आहेत.

रात्रीच्या काळोखात फक्त दिव्यांचा लखलखाट रस्त्यांवर दिसत असून, सर्वत्र सामसूम दिसत आहे.

----------------

फोटो फाईल नेम : ३० एमडीईसी ०४ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगावी मोसम पुलावर रात्री साडेअकरा वाजता असलेला शुकशुकाट.

फोटो फाईल नेम : ३० एमडीईसी ०७ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगावी नेहमी वर्दळ असणाऱ्या किदवाई रोड रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास असलेला शुकशुकाट.

फोटो फाईल नेम : ३० एमडीईसी ०९ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगावी दरेगाव नाक्यावरील पुलाजवळ तैनात पोलीस बंदोबस्त रात्री दीड वाजता.

===Photopath===

301220\30nsk_9_30122020_13.jpg~301220\30nsk_10_30122020_13.jpg~301220\30nsk_11_30122020_13.jpg

===Caption===

फोटो फाईल नेम : ३० एमडीईसी ०४ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी मोसम पूलावर रात्री साडेअकरा वाजता असलेला शुकशुकाट.फोटो फाईल नेम : ३० एमडीईसी ०७ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी नेहमी वर्दळ असणाऱ्या किदवाई रोड रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास असलेला शुकशुकाट.फोटो फाईल नेम : ३० एमडीईसी ०९ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी दरेगाव नाक्यावरील पुलाजवळ तैनात पोलीस बंदोबस्त रात्री दीड वाजता.~फोटो फाईल नेम : ३० एमडीईसी ०४ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी मोसम पूलावर रात्री साडेअकरा वाजता असलेला शुकशुकाट.फोटो फाईल नेम : ३० एमडीईसी ०७ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी नेहमी वर्दळ असणाऱ्या किदवाई रोड रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास असलेला शुकशुकाट.फोटो फाईल नेम : ३० एमडीईसी ०९ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी दरेगाव नाक्यावरील पुलाजवळ तैनात पोलीस बंदोबस्त रात्री दीड वाजता.~फोटो फाईल नेम : ३० एमडीईसी ०४ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी मोसम पूलावर रात्री साडेअकरा वाजता असलेला शुकशुकाट.फोटो फाईल नेम : ३० एमडीईसी ०७ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी नेहमी वर्दळ असणाऱ्या किदवाई रोड रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास असलेला शुकशुकाट.फोटो फाईल नेम : ३० एमडीईसी ०९ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी दरेगाव नाक्यावरील पुलाजवळ तैनात पोलीस बंदोबस्त रात्री दीड वाजता.

Web Title: In Malegaon, after ten o'clock at night, Shukshukat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.