मालेगाव : मूकमोर्चासाठी वाहनांची व्यवस्थाहजारो कार्यकर्ते सामील

By admin | Published: October 3, 2016 10:58 PM2016-10-03T22:58:27+5:302016-10-03T23:52:44+5:30

मालेगाव : मूकमोर्चासाठी वाहनांची व्यवस्थाहजारो कार्यकर्ते सामील

Malegaon: Arrangement of vehicles for the silent march; | मालेगाव : मूकमोर्चासाठी वाहनांची व्यवस्थाहजारो कार्यकर्ते सामील

मालेगाव : मूकमोर्चासाठी वाहनांची व्यवस्थाहजारो कार्यकर्ते सामील

Next

संगमेश्वर : माजी उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नाशिक येथे आयोजित मोर्चासाठी मालेगाव शहर व तालुक्यातून हजारो समर्थक आज सकाळपासूनच नाशिककडे रवाना झाले.
मोर्चाला जाण्यासाठी शेकडो वाहनांची व्यवस्था ठिकठिकाणाहून करण्यात आली होती. भुजबळांना मानणारा मोठावर्ग मालेगाव परिसरात आहे. माळी समाजाची मोठी लोकसंख्या या भागात असल्याने माळी समाजासह इतर मागासवर्गीय समाजातील हजारो समर्थक नाशिककडे रवाना झाले.
गेले आठवडाभर येथे या मोर्चाची जोरदार तयारी करण्यात येत होती. संगमेश्वरसह तालुक्यात ठिकठिकाणी बैठका घेण्यात आल्या होत्या. संगमेश्वरात तर प्रत्येक चौकात बैठका घेण्यात आल्या होत्या. एकट्या संगमेश्वरात १५ चौक बैठका होऊन जोरदार प्रचार करण्यात आला होता. समता परिषदेचे जिल्हानेते दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावाही झाला होता. बाळासाहेब बागुल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी शहर व तालुक्यात मोटारसायकल फेरी काढली होती. अ‍ॅड. रमेश मोरे, नगरसेवक नरेंद्र सोनवणे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष धर्मा भामरे यांच्यासह सर्वधर्मीय ओबीसी कार्यकर्त्यांनी प्रचार मेळाव्यात सहभाग नोंदविला हे विशेष. राष्ट्रवादीबरोबरच शिवसेना, मनसे, कॉँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते यात सहभागी झाल्याचे दिसून आले. (वार्ताहर)

Web Title: Malegaon: Arrangement of vehicles for the silent march;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.