मालेगाव : उर्दू शिक्षक संघाला शालेय शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन; निवेदन सादर शाळा सिद्धी अ ग्रेडची अट काढून टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:01 AM2017-11-13T00:01:46+5:302017-11-13T00:11:13+5:30

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी शासन आदेशात शाळा सिद्धी अ ग्रेड काढून टाकण्याचे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.

Malegaon: Assurance of school education minister to Urdu teacher team; The school will remove the condition of A grade A for submission | मालेगाव : उर्दू शिक्षक संघाला शालेय शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन; निवेदन सादर शाळा सिद्धी अ ग्रेडची अट काढून टाकणार

मालेगाव : उर्दू शिक्षक संघाला शालेय शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन; निवेदन सादर शाळा सिद्धी अ ग्रेडची अट काढून टाकणार

Next
ठळक मुद्देराज्यातील शिक्षकांमध्ये असंतोष निर्माणप्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी निवेदनशाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात

मालेगाव : वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी शासन आदेशात शाळा सिद्धी अ ग्रेड काढून टाकण्याचे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.
वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी देण्यासंदर्भात २३ आॅक्टोबर रोजी शासन आदेशात शालेय विभागाने शाळा सिद्धी अ दर्जा आवश्यक असल्याची तरतूद केली होती. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ही बाब राज्याचे शिक्षणमंत्री तावडे व शालेय सचिव नंदकुमार यांच्या निदर्शनास अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ पदाधिकारी यांनी मंत्रालयात झालेल्या भेटीमध्ये आणून दिली व ही अट रद्द करावी अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य करून ही शाळा सिद्धी अ दर्जा अट रद्द करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस साजीद अहमद यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील उर्दू विद्यार्थी शिक्षक शाळांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सचिव असिम गुप्ता, सचिव नंदकुमार यांना निवेदन देण्यात आले. उर्दू शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी, आॅनलाइन कामे बंद करावी, जुनी पेन्शन योजना सुरू करावी, २७ फेब्रुवारी बदली धोरणात सुधारणा करावी, शाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, घोषित अघोषित शाळांना अनुदान द्या, नगरपालिका, महानगरपालिका इच्छुक शिक्षकांची आॅनलाइन बदली करा, अल्पसंख्याक विद्यार्थिनींना विना अट शिष्यवृत्ती द्यावी, उर्दू शिक्षकांना पदोन्नती द्यावी आदी विविध मागण्या करण्यात आल्या. त्यावर मंत्रालयात बैठकीदरम्यान आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस साजीद अहमद, राज्य सहसचिव अल्ताफ अहमद, राज्य उपाध्यक्ष सलीम शेख, शाहीद अख्तर आदी उपस्थित होते.

Web Title: Malegaon: Assurance of school education minister to Urdu teacher team; The school will remove the condition of A grade A for submission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.