मालेगावला कोरोनाबाबत जनजागृती बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 11:29 PM2020-03-06T23:29:58+5:302020-03-06T23:31:57+5:30
चीन, आॅस्ट्रेलिया, इराण या देशात शिक्षणासाठी गेलेल्या मालेगाव शहरातील चौघांना कोणताही त्रास नाही; मात्र त्यांची १४ दिवस वैद्यकीय तपासणी केली जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त किशोर बोर्डे व आरोग्य अधिकारी सायका अन्सारी यांनी केले आहे.
मालेगाव : चीन, आॅस्ट्रेलिया, इराण या देशात शिक्षणासाठी गेलेल्या मालेगाव शहरातील चौघांना कोणताही त्रास नाही; मात्र त्यांची १४ दिवस वैद्यकीय तपासणी केली जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त किशोर बोर्डे व आरोग्य अधिकारी सायका अन्सारी यांनी केले आहे.
आयुक्त बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस यांनी खातेप्रमुखांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली आहे. बाहेरून आलेल्या प्रवाशांवर नजर ठेवणे, सर्दी, खोकला, ताप, दम लागणाऱ्या रुग्णांसाठी आयसोलीसेन वॉर्ड तयार करणे, नागरिकांमध्ये कोरोना व्हायरसबाबत जनजागृती व्हावी यासाठी शहरातील मुख्य चौकांमध्ये होर्डींग लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. साबण व पाणी वापरून हात स्वच्छ धुवा, मांस व अंडी शिजवून व उकडून खावे, जंगली किंवा पाळीव प्राण्यांशी जवळचा संबंध टाळावा, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.