मालेगावी बहरली तरूआईची वृक्षचळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:12 AM2021-07-17T04:12:35+5:302021-07-17T04:12:35+5:30
शहरातील वृक्षप्रेमी व नागरिकांच्या आर्थिक दान, श्रमसेवेतून पर्यावरणपूरक देशी वृक्षांचे तरूवनदेखील तयार करण्यात आले आहे. २४ जुलै २०१८ पासून ...
शहरातील वृक्षप्रेमी व नागरिकांच्या आर्थिक दान, श्रमसेवेतून पर्यावरणपूरक देशी वृक्षांचे तरूवनदेखील तयार करण्यात आले आहे. २४ जुलै २०१८ पासून मोसम पुलाजवळील न्यायाधीशांच्या वसाहत आवारातील जागेत वृक्षांची रोपटी लावण्यात आली आहेत. या ठिकाणी जवळपास ३० प्रकारची देशी झाडांची रोपे लावण्यात आली आहेत, तसेच शहरातील मसगा व पोलीस कवायत मैदान परिसर, बाळासाहेब क्रीडा संकुल, तहसील कार्यालयाचे आवार, ६० फुटी रोड, सटाणा रोडवरील शेकडो वृक्ष बहरली आहेत. संगमेश्वर भागातही मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. एकेकाळी उजाड असणारे रस्त्यांचे कडे आता हिरवेगार झाले आहे. नागरिकही या वृक्षारोपण कामात सहकार्य करीत आहेत. स्मृतिप्रीत्यर्थ रोपट्यांचे रोपण करून त्यांना पिंजरा व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तरूआईच्या या वृक्षचळवळीला मात्र महापालिका प्रशासनाने बळ दिले नाही. तरूआई संस्थेकडून लावण्यात येणाऱ्या वृक्षांची काही समाजकंटकांकडून मोडतोड केली जाते. याची तक्रार संबंधित विभागाकडे केल्यावरही त्याची दखल घेतली जात नाही. गेल्या ६ ते ७ वर्षांपासून वृक्षचळवळ निर्माण करणाऱ्या तरूआईच्या सदस्यांना सामाजिक संस्थांनी, महापालिका व लोकप्रतिनिधींनी पाठबळ देणे गरजेचे झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाकाळात वृक्षलागवड चळवळ संथ गतीने सुरू असली तरी तरूआईच्या या उपक्रमाला शहरवासीयांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.
फोटो फाइल नेम : १६ एमजेयूएल ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी तरूआई संस्थेने लावलेले वृक्ष असे बहरले आहेत.
160721\16nsk_19_16072021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.