मालेगाव बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:13 AM2021-03-22T04:13:14+5:302021-03-22T04:13:14+5:30
मालेगावचा आकडा दीड हजाराकडे मालेगाव : शहरात कोरोनाचा प्रसार वेगात होत असून दररोज दीडशे ते दोनशे बाधित मिळत ...
मालेगावचा आकडा दीड हजाराकडे
मालेगाव : शहरात कोरोनाचा प्रसार वेगात होत असून दररोज दीडशे ते दोनशे बाधित मिळत आहे. शहरात शनिवारपर्यंत अकराशेच्यावर बाधित आढळले होते. त्यामुळे येत्या दोन दिवसात दीड हजारावर बाधितांची संख्या पोहोचणार आहे . नागरिक काळजी घेताना दिसत नाही. होम आयसोलेशन असलेले बाधित शहरात मोकाट फिरत असून, त्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची गरज आहे.
मालेगावातील रस्ते पडले ओस
मालेगाव : शहर परिसरात उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, भरदुपारी रस्ते ओस पडू लागले आहेत. त्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने काही सुज्ञ नागरिक घरातच बसून राहणे पसंत करीत आहेत. मालेगावी भर दुपारी सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. लोटगाड्यावर खरबूज आणि टरबूज विक्रीसाठी आले आहेत. उन्हापासून बचाव व्हावा यासाठी लोक रस्त्याच्या कडेला झाडाखाली तसेच दुकानांच्या आडोशाला सावलीसाठी आश्रय घेताना दिसत आहेत.
स्मशानभूमी कामाच्या चौकशीची मागणी
मालेगाव : तालुक्यातील आघार येथील स्मशानभूमीच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महेंद्र हिरे यांनी केली आहे. याबाबत पंचायत समितीचे उपअभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्मशानभूमीतील दहनशेडचे लोखंडी खांब सिमेंट काॅंक्रीटमध्ये न टाकता साध्या पद्धतीने उभे करण्यात आले आहेत. ग्रामस्थांनीही त्याची पाहणी केली असून, मोठ्या पत्र्यांचा भार खांब कसे पेलू शकतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मनपा आयुक्तांच्या कारभाराविरोधात तक्रार
मालेगाव : शहरातील महापालिकेचे आयुक्त दीपक कासाार गेल्या काही दिवसांपासून नेहमी रजेवर व बाहेरगावी असतात. कासार यांच्या काळात महापालिकेत झालेल्या खर्चाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हिफाजत ग्रुपचे अध्यक्ष मो,आरिफ नुरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.