मालेगाव : दोघांनी तक्रारी मागे घेतल्याने वादावर पडदा मारहाण प्रकरणामुळे भाजपा कार्यकर्ते सैरभैर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 11:41 PM2017-11-09T23:41:39+5:302017-11-10T00:03:01+5:30

नोटाबंदी निर्णयाच्या स्वागत कार्यक्रम आयोजनाच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशावरून भाजपाचे युवा नेते अद्वय हिरे व महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये झालेली शाब्दिक बाचाबाची, हाणामारी व शिवीगाळ या अंतर्गत वादामुळे भाजपातील कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.

Malegaon: BJP workers shouted slogans after a complaint was lodged against both the leaders | मालेगाव : दोघांनी तक्रारी मागे घेतल्याने वादावर पडदा मारहाण प्रकरणामुळे भाजपा कार्यकर्ते सैरभैर

मालेगाव : दोघांनी तक्रारी मागे घेतल्याने वादावर पडदा मारहाण प्रकरणामुळे भाजपा कार्यकर्ते सैरभैर

Next
ठळक मुद्देसामान्य कार्यकर्ते मात्र या प्रकाराने अस्वस्थव्हॉट्सअ‍ॅपवर शाब्दिक चकमकगाडीवर दगडफेक व मारहाण केल्याचा आरोप राजकीय वातावरण ढवळून निघाले

मालेगाव : नोटाबंदी निर्णयाच्या स्वागत कार्यक्रम आयोजनाच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशावरून भाजपाचे युवा नेते अद्वय हिरे व महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये झालेली शाब्दिक बाचाबाची, हाणामारी व शिवीगाळ या अंतर्गत वादामुळे भाजपातील कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी मागे घेतल्याने वादावर पडदा पडला असला, तरी सामान्य कार्यकर्ते मात्र या प्रकाराने अस्वस्थ झाले आहेत.
नोटाबंदीच्या निर्णयाला वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने भाजपाचे महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांनी स्वागत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा संदेश त्यांच्या समर्थकांनी भाजपाच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला होता. या ग्रुपवर अद्वय हिरे यांनीही संदेश टाकला होता. यावरून दोघा गटांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर शाब्दिक चकमक उडाली. हिरे यांनी गायकवाड समर्थकांना बंगल्यावर येण्याचे आव्हान दिले होते. त्यास प्रत्युत्तर म्हणून गायकवाड समर्थकांनीच सटाणा नाक्यावर येण्याचे आव्हान दिले. यानंतर हिरे हे त्यांच्या काही समर्थकांना घेऊन गायकवाड यांच्या निवासस्थानाकडे आले असता गायकवाड यांच्या समर्थकांनी गाडीवर दगडफेक व मारहाण केल्याचा आरोप हिरे यांनी केला आहे. हिरे यांनी सटाणानाका भागात येऊन शिवीगाळ व असभ्य वर्तन केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.
या मारहाणीत हिरे जखमी झाले होते. त्यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. यानंतर हिरे छावणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. पोलीस अधीक्षकांचा भ्रमणध्वनीही बंद येत होता. त्यामुळे हिरे यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांनी दोन्ही गटांच्या तक्रारींची नोंद घेतली. बुधवारी दिवसभर राजकीय पदाधिकाºयांनी व आपापसातील सामंजस्यामुळे पोलीस ठाण्यातील दाखल तक्रारी मागे घेण्यात आल्या. दरम्यान, या प्रकारामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Web Title: Malegaon: BJP workers shouted slogans after a complaint was lodged against both the leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.