मालेगाव सेतू केंद्राला एक लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:19 AM2019-07-26T00:19:03+5:302019-07-26T00:22:30+5:30
मालेगाव : तहसील कार्यालय आवारातील सेतू केंद्रातून बनावट बारकोडद्वारे प्रतिज्ञापत्र तयार करून शासनाची फसवणूक प्रकरणाच्या तक्रारीवर सुनावणी होऊन प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी सेतू कार्यालयाला एक लाख रुपयांचा दंड केला आहे.
Next
ठळक मुद्देतक्रारीवर सुनावणी घेण्यात आली.
मालेगाव : तहसील कार्यालय आवारातील सेतू केंद्रातून बनावट बारकोडद्वारे प्रतिज्ञापत्र तयार करून शासनाची फसवणूक प्रकरणाच्या तक्रारीवर सुनावणी होऊन प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी सेतू कार्यालयाला एक लाख रुपयांचा दंड केला आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भगवान आढाव यांनी सेतू कार्यालयात प्रतिज्ञापत्र साक्षांकित करताना गैरव्यवहार होत असल्याची तक्रार जानेवारी २०१९ मध्ये केली होती.
या तक्रारीवर सुनावणी घेण्यात आली. या अकरा प्रतिज्ञा पत्रावर बारकोड क्रमांक बोगस आढळून आला. सेतू संचालकाने बनावट बारकोडद्वारे प्रतिज्ञापत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.