मालेगाव - मनमाड रस्त्यावर बर्निंग कंटेनर; होरपळून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:25 PM2021-06-01T16:25:48+5:302021-06-01T16:26:12+5:30

मालेगाव : मनमाड - मालेगाव रस्त्यावर कौळाणे शिवारात सोमवारी रात्री कंटेनर व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या आगीत कंटेनर चालक दिनदयाल (४०) (पूर्ण नाव माहीत नाही) व ट्रक चालक रामप्रसाद गोपीलाल (२५) या दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Malegaon - Burning container on Manmad road; Both died on the spot | मालेगाव - मनमाड रस्त्यावर बर्निंग कंटेनर; होरपळून दोघांचा मृत्यू

मालेगाव - मनमाड रस्त्यावर बर्निंग कंटेनर; होरपळून दोघांचा मृत्यू

Next

मालेगाव : मनमाड - मालेगाव रस्त्यावर कौळाणे शिवारात सोमवारी रात्री कंटेनर व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या आगीत कंटेनर चालक दिनदयाल (४०) (पूर्ण नाव माहीत नाही) व ट्रक चालक रामप्रसाद गोपीलाल (२५) या दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर ट्रकमधील मुकेशकुमार गोपीलाल हा जखमी झाला आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.३१) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मनमाड - मालेगाव रस्त्याचे सिसमचे रॉड घेवून मालेगावकडून मनमाडकडे जाणाऱ्या कंटेनर क्रमांक आरजे १४ जीजे ७११२ व कांदा घेवून मनमाडहून मालेगावकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक एचआर ४७ सी ४३२७ यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर दोघा वाहनांनी पेट घेतला. या आगीत ट्रक व कंटेनर चालकांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव अग्नीशमन दल व तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या अपघातामुळे मनमाड - मालेगाव रस्त्यावरील वाहतूक सुमारे ३ तास खोळंबली होती. आग आटोक्यात आणल्यानंतर दोन्ही वाहने रस्त्यावरुन हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताचा पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. व्ही. मोरे करीत आहेत.

Web Title: Malegaon - Burning container on Manmad road; Both died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक