मालेगावच्या एमआयएमच्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:24 PM2020-03-26T23:24:23+5:302020-03-26T23:25:18+5:30

मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांना धक्काबुक्की व कर्मचाऱ्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत कार्यालयात कोंडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मालेगाव मध्यचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्यासह इतर अकरा जणांविरुद्ध दंगल, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संचारबंदीचे उल्लंघन व शिवीगाळ केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Malegaon case filed against MIM lawmaker | मालेगावच्या एमआयएमच्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

मालेगावच्या एमआयएमच्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

Next

मालेगाव : मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांना धक्काबुक्की व कर्मचाऱ्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत कार्यालयात कोंडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मालेगाव मध्यचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्यासह इतर अकरा जणांविरुद्ध दंगल, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संचारबंदीचे उल्लंघन व शिवीगाळ केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक किशोर डांगे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. २५) रात्री हा प्रकार घडला होता.
एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी डॉ. किशोर डांगे यांना तुम्ही माझा फोन का उचलला नाही, खलील दादाला का रुग्णालयात दाखल केले असे विचारत व त्यांच्या सोबत असलेल्या नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी, नईम अहमद युसुफ इलियास, अकलम अन्सारी यांच्यासह पाच अनोळखी इसमाने आरडाओरड करीत शिवीगाळ केली तसेच डॉ. डांगे यांना धक्काबुक्की केली. दालनात असलेल्या कर्मचाऱ्यांना हाता-चापटीने व लाथाबुक्यांनी मारहाण करून कार्यालयात कोंडून ठेवले. सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. एन. देशमुख हे करीत आहेत.

Web Title: Malegaon case filed against MIM lawmaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.