मालेगावी दसरा सण पारंपारिक पद्धतीने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:23 AM2017-10-01T01:23:46+5:302017-10-01T01:23:51+5:30

शहर परिसरात दसरा सण मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सायंकाळी विजयादशमी उत्सव समितीतर्फे येथील दसरा मैदानावर सुमारे ४५ फूट उंचीच्या तर कलेक्टरपट्ट्यातील गिरणा नदीकाठावरील रामलिला मैदानावर सुमारे ५१ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे @‘जय श्रीरामाच्या’ घोषात दहन करण्यात आले. दरम्यान, सकाळपासूनच शहरात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण दिसून आले.

 Malegaon celebrates Dasara festival in traditional way | मालेगावी दसरा सण पारंपारिक पद्धतीने साजरा

मालेगावी दसरा सण पारंपारिक पद्धतीने साजरा

googlenewsNext

मालेगाव : शहर परिसरात दसरा सण मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सायंकाळी विजयादशमी उत्सव समितीतर्फे येथील दसरा मैदानावर सुमारे ४५ फूट उंचीच्या तर कलेक्टरपट्ट्यातील गिरणा नदीकाठावरील रामलिला मैदानावर सुमारे ५१ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे @‘जय श्रीरामाच्या’ घोषात दहन करण्यात आले. दरम्यान, सकाळपासूनच शहरात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण दिसून आले. शहरातील प्रमुख  बाजारपेठेमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. येथील सराफ बाजारात सोने खरेदी करण्याची लगबग दिसून आली. दसºयाचे मुहूर्त साधत वाहने व इतर घरगुती सामान खरेदीला नागरिकांनी पसंती दिली होती.  शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता किल्ला हनुमान मंदीरापासून श्रीराम यांच्या वेषभुषेतील (भुषण पाटील), लक्ष्मण (सागर चौधरी) व हनुमान (भैय्या भावसार) यांची सजविलेल्या रथातून सवाद्य गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक शिवशक्ती चौक, किल्ला हनुमान मंदिर, गुळबाजार, तांबाकाटा, टिळकरोड, वृंदावन चौक, चंदनपुरी गेट मार्गे या पारंपारिक मार्गावरुन मिरवणुक काढण्यात आली. बालाजी चौकात प्रभु श्रीराम व प्रभु श्रीबालाजी यांची भेट झाली. नंतर ही मिरवणूक मुख्य दसरा मैदानावर आली. मिरवणूक येता क्षणीच मैदानावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी राष्टÑीय एकात्मता समिती व प्रशासनातर्फे राम-लक्ष्मण-हनुमान यांचा प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी अजय मोरे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे यांनी सत्कार केला. त्यानंतर श्रीरामाच्या वेषभुषेतील भूषण पाटील यांनी फटाक्यांनी प्रज्वलीत अग्निबाण डागून रावणाचे दहन केले. रावण दहनापूर्वी सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद शर्मा यांनी उपस्थित नागरिकांना रामायणाची महती विशद केली.  रावण दहन कार्यक्रमास राजेंद्र भोसले, प्रमोद शुक्ला, रामदास बोरसे, सोहनलाल जैन, संजय नेरकर, बंटी चौधरी, विकी शर्मा, जयवंत जंगम, किरण पाटील, शीतल पवार, विजय चौधरी, आदिंसह हिंदू-मुस्लिम नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यु. आर. पाटील, लकी गिल, नगरसेवक सुनील गायकवाड, मदन गायकवाड, संजय काळे, सुवर्णा शेलार, साबणे आदि उपस्थित होते. रावण दहन कार्यक्रमास दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद बच्छाव, उपाध्यक्ष जगदीश गोºहे, कार्याध्यक्ष तात्या महाले, सुधाकर गायकवाड, राकेश शिंदे, दिपक गायकवाड, जिभाऊ पाटील, दिनेश पवार, शाम बच्छाव, युवा गिते, अनिल गायकवाड, सर्जेराव पवार, मुकेश झुनझुनवाला, भरत बागुल, सागर पाटील, जिभाऊ पाटील, श्रीकांत शेवाळे, दिनेश पाटील आदिंसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन नरेंद्र गुरव यांनी केले.  दरम्यान, दसरा सणानिमित्त सकाळपासूनच नागरिकांनी मोसमपूल चौकात व रावळगांवनाका भागात झेंडुची फुले, आपट्याची पाने व पूजेचे साहित्य घेण्यासाठी गर्दी केली होती. दसºयाचा पार्श्वभूमीवर वाहन, सोने, इलेक्ट्रॉनीक वस्तू आदींची बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने लाखो रुपयांची उलाढाल झाली. घरोघरी तसेच व्यापारी प्रतिष्ठानात पूजा करण्यात आली.

Web Title:  Malegaon celebrates Dasara festival in traditional way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.