मालेगाव : चेंबूरच्या फॅशन डिझायर्सने केली आकर्षक वस्त्रे डिझाइन रंगीत साडी जाणार मुंबईच्या रॅम्पवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:36 AM2018-01-06T00:36:43+5:302018-01-06T00:37:58+5:30
मालेगाव : मालेगावातील यंत्रमाग व्यवसायाला शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे.
मालेगाव : मालेगावातील यंत्रमाग व्यवसायाला शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे. येथील रंगीत साडीला बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने येत्या बुधवारी (दि. १०) मुंबईच्या चेंबूरमध्ये विविध मॉडेल्स मालेगावची रंगीत साडी परिधान करून ‘रॅम्प’वर उतरणार आहेत.
यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन चार महिन्यांपूर्वी मालेगावात येऊन गेले. त्यावेळी येथे विविध कार्यक्रम झाले. यंत्रमाग कामगार मुकादम यांना प्रमाणपत्र देऊन शिक्षण प्रवाहात आणण्यात आले. त्याचप्रमाणे गॅरेजवर काम करणारे व शिवणकाम करणाºया महिलांना प्रमाणपत्र देऊन त्यांनाही शिक्षण प्रवाहात आणावे यादृष्टीने यावेळी चर्चा झाली. भिवंडी, मालेगाव आणि धुळे येथील गॅरेजवाले व शिवणकाम करणाºया महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या कार्यक्रमातच मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्याशी मालेगावच्या यंत्रमागावर तयार होणाºया रंगीत साडीबाबत चर्चा करण्यात आली. मालेगावच्या रंगीत साडीला बाजारपेठ मिळावी व यंत्रमाग व्यवसायाच्या विकासास हातभार लागावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन वायुनंदन यांनी दिले होते. त्यानुसार वायुनंदन यांनी मुंबईतील चेंबूर येथील फॅशन डिझायनर इन्स्टिट्यूटशी चर्चा केली. फॅशन डिझायनर इन्स्टिट्यूटची टीम मालेगावात येऊन गेली. त्यांनी विविध यंत्रमाग कारखान्यांना भेट देऊन पाहणी केली. येथील बाबुशेठ यांच्या यंत्रमागातील सफेद आणि रंगीत साडी त्यांनी मुंबईत नेली. शिवाय स्पिनिंग मिल आणि डॉ. बळीराम हिरे हायटेक क्लस्टरलाही भेट दिली. मालेगावातून नेलेल्या रंगीत साडीपासून मुंबईत डिझायनर्सनी फॅशनेबल आकर्षक असे ड्रेस बनवले. त्यासाठी श्रीमती अंजली, सुबोध, नीलिमा ठाकूरसह मुक्त विद्यापीठाचे डॉ. जयदीप निकम, राम ठाकर यांनी मदत केली. मुंबईच्या चेंबूरमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये विविध मॉडेल्स सायंकाळी ६ वाजता फाइन आटर््स आडोटेरियमच्या ‘रॅम्प’वर उतरणार असून, मालेगावच्या रंगीत साडीपासून बनविलेल्या विविध प्रकारचे आकर्षक कपड्यांचे दर्शन मुंबईकरांना घडणार आहे. यातून मालेगावच्या रंगीत साडीला बाजारपेठ उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती अतीक शेख यांनी दिली.
रंगीत साडीवर संशोधन
मालेगावातील बाबुशेठ यांच्या यंत्रमागावर तयार झालेली रंगीत साडी मुंबईच्या ‘टीम’ने नेली. तेथे रंगीत साडीवर संशोधन करण्यात आले. संशोधनानंतर महिलांसाठी फॅशनेबल कपडे तयार करण्यात आले आहेत. यू ट्यूबवर मालेगावातील रंगीत साडीबाबत इंडियन टेक्सटाईल डिझायनर्स इन्स्टिट्यूट चेंबूरची माहिती देण्यात आली आहे.