मालेगाव शहराचा ९०.८९ तर ग्रामीणचा ९३.३९ टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 09:52 PM2020-07-16T21:52:21+5:302020-07-17T00:06:22+5:30
मालेगाव : इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी आॅनलाइन जाहीर झाला. यात शहराचा निकाल ९०.८९ टक्के तर मालेगाव ग्रामीणचा निकाल ९३.३९ टक्के इतका लागला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली.
मालेगाव : इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी आॅनलाइन जाहीर झाला. यात शहराचा निकाल ९०.८९ टक्के तर मालेगाव ग्रामीणचा निकाल ९३.३९ टक्के इतका लागला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. निकालात मालेगाव शहर व ग्रामीण विभागाचा टक्का वाढल्याचे निकालावरून दिसून येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत शहरातील निकालाची टक्केवारी ८.२७ने वाढली तर ग्रामीण भागातदेखील ७.९४ टक्केने वाढली आहे.
शहरात २ हजार ८८३ पैकी २ हजार ७२२ मुली उत्तीर्ण झाल्या तब्बल ९४.४२ टक्के मुलींनी निकालात बाजी मारली आहे. तर २ हजार ७१५ पैकी २ हजार ३४३ मुले उत्तीर्ण झाले असून, ८६.३० अशी मुलांची टक्केवारी आहे.
मालेगाव ग्रामीणमध्ये १ हजार ४४२ पैकी १ हजार ३९९ मुली उत्तीर्ण झाल्या असून, निकालाची
टक्केवारी तब्बल ९७.०२ टक्के इतकी आहे. तसेच २ हजार ५१० मुलांपैकी २ हजार २९८ मुले उत्तीर्ण झाले असून, त्यांची टक्केवारी ९१.५५ इतकी आहे. निकाल बघण्यासाठी बाहेर गर्दी दिसली नाही भ्रमणध्वनीवरच विद्यार्थ्यांनी निकाल पाहिला.