मालेगाव शहराला आमदार दोन, रस्त्यांच्या खड्ड्यांना पाहतो कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:17 AM2021-08-12T04:17:31+5:302021-08-12T04:17:31+5:30
-------------------- काही रस्त्यांवरचे उखडले डांबर मनमाडपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून कंटेनर, ट्रेलर, ट्रक यांची पलटी होण्याचे प्रमाण ...
--------------------
काही रस्त्यांवरचे उखडले डांबर
मनमाडपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून कंटेनर, ट्रेलर, ट्रक यांची पलटी होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी माती रस्त्यावर आली असून रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. जळगाव- सावकारवाडी रस्ताही सिंगल झाला आहे. समोरासमोर आलेली वाहने दिसत नाहीत. जळगाव-निंबायती रस्त्यावर डांबर उखडून वर आले आहे. नाल्यापुढे रस्ता खचला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी टाकलेले पाइप उघडे पडले आहेत. मालेगाव- दाभाडी रस्ताही ठिकठिकाणी उखडला आहे. या मार्गावर पाइप टाकून मोरी बांधण्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. दाभाडी-पिंपळगाव रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. रावळगाव रस्त्यावर काटेरी झुडपे वाढली आहेत. माळमाथा भागातही गुगुळवाडकडे जाणारा रस्ता उखडला आहे. टेहरेफाटा ते दाभाडीपर्यंत सिमेंट रस्ता कामासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांनी २५ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.