मालेगाव शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:14 PM2020-07-27T21:14:57+5:302020-07-27T23:28:51+5:30

मालेगाव : स्थानिक प्रशासकीय यंत्रणेची मेहनत, उपाययोजना व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे मालेगाव शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे.

Malegaon city on the threshold of coronation! | मालेगाव शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर!

मालेगाव शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर!

Next
ठळक मुद्देदिलासादायक : केवळ ६८ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह; १८५ पैकी ५३ प्रतिबंधित क्षेत्र, प्रशासनाची एकजूट

अतुल शेवाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : स्थानिक प्रशासकीय यंत्रणेची मेहनत, उपाययोजना व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे मालेगाव शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे.
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात आता केवळ ६८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेन्मेंट झोन) कमालीची
घट झाली आहे. सध्या केवळ ५३ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित आहेत. कोविडचा उद्रेक झाल्यानंतर मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते.१शहरवासीयांनी कोरोनाशी प्रदीर्घ काळ लढा दिला. सद्य:स्थितीत केवळ ६८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर येथील मसगा महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासकीय यंत्रणेची अहोरात्र मेहनत व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे मालेगाव शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. प्रारंभी झपाट्याने झालेली रुग्णवाढ सध्या कमी झाली आहे. नागरिक व प्रशासनाने एकजूट दाखवल्यामुळे हॉटस्पॉट ठरलेले मालेगाव सध्या पूर्वपदावर आले आहे. २प्रशासनाने कोरोबाबतचे अज्ञान, गैरसमज दूर करून प्रशासनाप्रति विश्वास निर्माण केला. परिणामी मालेगाव पॅटर्न उदयास आला आहे. प्रशासनाने दोनशे खाटांचे नॉनकोविड व बाराशे खाटांचे कोविड रुग्णालय तयार केले होते. कोरोनाबाधित रुग्णांवर आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी पद्धतीचे उपचार करण्यात आले. अनुभवी डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले. शासनाने पॅरामेडिकल स्टाफ उपलब्ध करून दिला. बाहेरगावचे तज्ज्ञ डॉक्टर बोलाविण्यात आले होते. खासगी डॉक्टरांनी अहोरात्र मेहनत घेतली. ३शहराच्या पूर्व भागातील शंभर डॉक्टरांनी मोहल्ला क्लिनिक संकल्पना राबवून रुग्णांवर उपचार केले व कोरोनाची भीती पळवून लावली. पोलीस, महसूल, मनपा प्रशासनाने कर्तव्य चोख बजावले तसेच विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. परिणामी राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असताना अगदी दाटीवाटीचे, गजबजलेले व झोपडपट्टीचे शहर म्हणून ओळख असलेले मालेगाव शहर सध्या कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे, ही बाब जिल्ह्यासह शहरवासीयांसाठी दिलासादायक आहे. गेल्या ८ एप्रिल रोजी कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले होते. यात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ होत गेली. शहरात तब्बल १ हजार २२५ बाधित रुग्ण आढळून आले होते, यापैकी १०७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ८४ जणांचा मृत्यू झाला. शहरात तब्बल १८५ प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले होते. जनजीवन विस्कळीत होऊन भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: Malegaon city on the threshold of coronation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.