मालेगावी कोरोनाबाधित चारशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 09:44 PM2020-05-06T21:44:26+5:302020-05-06T23:54:42+5:30

मालेगाव : शहरात मंगळवारी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तब्बल ५४ अहवालामुळे जबर धक्का बसला. यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या ४१६ झाली असून, १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Malegaon Corona-bound 400 crosses | मालेगावी कोरोनाबाधित चारशे पार

मालेगावी कोरोनाबाधित चारशे पार

Next


मालेगाव : शहरात मंगळवारी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तब्बल ५४ अहवालामुळे जबर धक्का बसला. यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या ४१६ झाली असून, १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला आणखी हादरा बसला असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येला लगाम घालण्यासाठी विविध तंत्रांचा अवलंब केला जात आहे.
मंगळवारपासून शहरात विविध ठिकाणी सर्दी, पडसे आदी आजार असलेल्या नागरिकांची मोफत तपासणी करण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना ध्वनिक्षेपकावरून तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मालेगावी पुण्याच्या सामाजिक संस्थेकडून रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत, तर मालेगाव शहराची माहिती असलेल्या आणि दांडगा जनसंपर्क असलेल्या सुनील कडासने यांना पुन्हा अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचा मालेगावकरांना चांगला फायदा होणार आहे. परिणामी बाहेर मोकाट फिरणाऱ्या लोकांना ते निश्चितच लगाम घालू शकतील.
आपले गाव सोडून मालेगावी बंदोबस्तासाठी आलेल्या एसआरपीएफ जवान बाधित होत असल्याने आणि पोलीसदेखील बाधित होत असल्याने पोलीस दलात चिंंतेचे वातावरण आहे. ३ मे रोजी ३२६ कोरोनाबाधित रुग्ण होते. दुसºया दिवशी ८१ निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह अहवाल आल्याने काहीसे हायसे वाटले होते. मात्र ४ मे रोजी ८ पॉझिटिव्ह अहवाल आल्याने रुग्ण संख्या ३३५वर पोहोचली तर काल ५ मे रोजी ४३ पैकी १७ जण पॉझिटिव्ह मिळून आले. रात्री आलेल्या अहवालात ३७ जण पुन्हा पॉझिटिव्ह मिळाले. यामुळे मंगळवारी दिवसभरात ५४ रुग्णांची भर पडून बाधितांची संख्या ४१६ वर जाऊन पोहोचली.
मालेगाव शहरात हेल्पलाइन सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून, बहुतेक कॉल्स हे जीवनावश्यक वस्तू, संचारबंदी कालावधीत मिळणाºया सुविधा, कोरोनासंदर्भातील प्राथमिक लक्षणे, कोविड आणि नॉनकोविड रुग्णालयांची माहिती आदी प्रश्नांचे व समस्यांचे निराकरण या हेल्पलाइन सेंटरवरून करण्यात आल्याचेही हेल्पलाइन सेंटर येथे कार्यरत मंडळ अधिकारी निकम यांनी सांगितले.
शहरामध्ये नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये सामान्य व
महिला रुग्णालयाचा समावेश आहे. कोविड केअर सेंटर्ससाठी आयएचएसडीपी बिल्डिंग व मन्सुरा हॉस्टेलचा समावेश करण्यात आला आहे. डेडिकेटिड कोविड हॉस्पिटलसाठी जीवन व फरहान हॉस्पिटल यांचा समावेश असल्याचे सहाय्यक चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी सांगितले.

---------------------------------

हेल्पलाइन सज्ज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नागरिकांसाठी हेल्पलाइन सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून, या हेल्पलाइन सेंटरचा भ्रमणध्वनी क्रमांक ७५०७४८६३२९ असा आहे. नागरिकांना असलेल्या अडचणी व सुविधेविषयी माहिती घेण्यासाठी ही हेल्पलाइन उपलब्ध करून देण्यात आली असून, आजपर्यंत जवळपास ८४ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतल्याचे हेल्पलाइन सेंटर येथे कार्यरत मंडळ अधिकारी निकम यांनी सांगितले. नागरिकांनी मदत घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Malegaon Corona-bound 400 crosses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक