मालेगाव, दाभाडीत चक्का जाम आंदोलन
By admin | Published: February 1, 2017 01:31 AM2017-02-01T01:31:00+5:302017-02-01T01:31:13+5:30
मराठा क्रांती मोर्चा : प्रांताधिकाऱ्यांसह तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर
मालेगाव : कोपर्डी प्रकरणातील संशयित आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करून बदल करावा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, मराठा समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे या मागण्यांच्या पूर्ततेसाठी येथील सकल मराठा समाजबांधवांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाटा परिसरात चक्का जाम आंदोलन छेडले. तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोपर्डी घटनेतील संशयित आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी यासह विविध मागण्यांप्रश्नी विविध मराठा संघटना आक्रमक झाल्या असून, याचाच एक भाग म्हणून राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार येथील मराठा क्रांती नियोजन समितीने चाळीसगाव फाट्यावर सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनापूर्वी सभा घेण्यात आली. यावेळी कोपर्डी घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. रमेश निकम यांनी मोर्चाचे नियम सांगितले. यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी वाहतुकीची कोंडी झाली. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांना सादर करण्यात आले. आंदोलनस्थळी अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनात प्रभाकर शेवाळे, अरुण पाटील, राजेंद्र शेवाळे, लकी गिल, दीपक देसले, विनोद देसले, जितेंद्र वाघ, डॉ. किशोर निकम, शेखर पगार, दिनेश पाटील, किशोर जाधव, डॉ. मनोज भामरे, योगेश पवार, प्रवीण कदम, दीपक सूर्यवंशी, राकेश पवार, देवेंद्र पवार, पराग निकम, विश्वास सूर्यवंशी आदिंसह शहर व तालुक्यातील विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी, सकल मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. दरम्यान, पोलीस प्रशासनाने आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतरही मराठा समाजबांधवांनी आंदोलन केले. त्यामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दाभाडीत चक्का जाम आंदोलन
गिसाका/दाभाडी : दाभाडी येथे बायपासवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. विद्यार्थिनी कुमोदिनी निकम, उत्कर्षा सूर्यवंशी, कोमल बच्छाव, तेजस्विनी पाटील, प्रणाली निकम, चिन्मयी निकम यांच्या हस्ते प्रांताधिकारी अजय मोरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशी मिळावी, अॅट्रॉसिटी कायदा शिथिल करावा आदि मागण्यांप्रश्नी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुनाजी निकम, हरिदादा निकम, अमोल रामदास निकम, आबा सोनवणे, पुरुषोत्तम निकम, बापू भामरे, ए. के. पाटील, अंताजी निकम, सागर देवरे, बापू भामरे, नामदेव अहिरे, मंगेश निकम, प्रवीण निकम, महेश महाले, दिनेश महाले, काकाजी निकम सहभागी झाले होते.
यावेळी शशी निकम, नंदू पवार, प्रमोद निकम, दशरथ निकम, अरुण देवरे, सुभाष निकम, संदीप पाटील, संजय निकम, अमोल निकम, बापू निकम, हेमराज भामरे, नीळकंठ निकम, विजय निकम, श्रीराम निकम, बापू मोरे, बंडू मानकर, सागर गवळी, नंदू माळी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, पोलीस निरीक्षक इंद्रजित विश्वकर्मा, दाभाडी आउटपोस्टचे पोलीस उपनिरीक्षक सारंग चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)