मालेगावी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:30+5:302021-06-25T04:12:30+5:30
बैठकीत शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे, आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्यासाठी शाळा, इमारती, समाज मंदिरे, मंगल ...
बैठकीत शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे, आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्यासाठी शाळा, इमारती, समाज मंदिरे, मंगल कार्यालये, लाॅन्स सज्ज ठेवणे, पूर परिस्थितीत पुलांवरील वाहतुकीचे नियोजन, जलवाहिनी फुटल्यास तातडीने दुरुस्ती, स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा, गटारी, ड्रेनेज सफाई, भूमिगत गटारींची स्थिती, शहरातील मुख्य नाल्यांसह गटारींची साफसफाई, पाऊस झाल्यावर शॉर्टसर्किट झालेल्या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करणे, विद्युत खांब रस्त्यावर कोसळल्यास तातडीने बाजूला हटविणे, आपत्कालीन परिस्थितीत दूरध्वनी यंत्रणा व मोबाईल यंत्रणा विस्कळीत होणार नाही याची दक्षता, पावसाळ्यात आवश्यक तो पुरेसा औषध साठा उपलब्ध करणे, आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवून प्रभाग कार्यालयांमध्ये पूर नियंत्रण कक्ष स्थापन करणे, धोकादायक ठिकाणे निश्चित करणे, धोकादायक इमारत मालकांना नोटीस बजावू, आदी सूचना बैठकीत देण्यात आल्या. बैठकीला मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, पोलीस उपअधीक्षक लता दोंदे, किल्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भदाणे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय महाजन, उपायुक्त राहूल पाटील, सहाय्यक आयुक्त तुषार आहेर, मुख्य लेखा परीक्षक राजू खैरनार, शहर अभियंता कैलास बच्छाव, अग्निशमन दल प्रमुख संजय पवार, तौसीफ शेख, विद्युत अधीक्षक अभिजित पवार, सहायक अभियंता शोएब अख्तर, जलसंपदा विभागाचे ए. बी. रौंदळ, पंचायत समितीचे एस. एस. मोरे, आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
फोटो फाईल नेम : २४ एमजेयुएन ०५ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत बोलताना पोलीस उपअधीक्षक लता दोंदे. समवेत विभागप्रमुख.
===Photopath===
240621\24nsk_52_24062021_13.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.