मालेगावी कुत्ता गोळीच्या वादातून तरूणावर प्राणघातक हल्ला; बेशुध्दावस्थेतत फेकून दिल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 13:40 IST2022-06-07T13:40:01+5:302022-06-07T13:40:24+5:30
याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगावी कुत्ता गोळीच्या वादातून तरूणावर प्राणघातक हल्ला; बेशुध्दावस्थेतत फेकून दिल्याचे उघड
मालेगाव (नाशिक) : मुंबई महामार्गालगतच्या ओवाडीनालाच्या पुलाखाली जमील अहमद अब्दूल जब्बार हा तरुण जखमी अवस्थेत आढळून आला आहे. त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. अज्ञात इसमाने कुत्ता गोळीच्या वादातून प्राणघातक हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जमील याला बेशुध्दावस्थेतत ओवाडी नाल्याच्या पुलाखाली फेकून दिल्याचे उघड झाले आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.