मालेगावी नेत्र तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:36 AM2021-02-05T05:36:00+5:302021-02-05T05:36:00+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. वाय. गाैड, सहदिवाणी न्यायाधीश ए. के. देशमुख, वाय. पी. पुजारी, एन. एन. झेंड, मालेगाव वकील संघाचे अध्यक्ष आर. के. बच्छाव, सचिव किशोर त्रिभूवन, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बशीर शेख उपस्थित होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी मार्गदर्शन केले. देवळा तालुक्यात मेशी येथे झालेल्या एसटी बस अपघातातील अपघातग्रस्तांना मदत करून त्यांचे प्राण वाचविणाऱ्या दत्तात्रय देवरे यांना जीवनदूत पुरस्काराने गौरविण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. डॉ. सुजय उघाडे व डॉ. ज्योती निकम यांनी नेत्र तपासणी केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे यांनी केले.
===Photopath===
280121\28nsk_46_28012021_13.jpg
===Caption===
मालेगावी उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि अपर सत्र न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबीराचे उद्घाटन करताना जिल्हा न्यायाधीश ए. एस. गांधी. समवेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर.