मालेगावी शेतकऱ्याला व्यापाऱ्याकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 01:10 AM2021-10-08T01:10:38+5:302021-10-08T01:11:36+5:30
मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व फळफळावळ विभागात शेतमाल लावण्याच्या वादावरून शेतकरी व व्यापारी यांच्यात मंगळवारी (दि. ५) झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत होऊन व्यापाऱ्याला मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तालुक्यात याची एकच चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत कॅम्प पोलिसांत कुणीही तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही.
मालेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व फळफळावळ विभागात शेतमाल लावण्याच्या वादावरून शेतकरी व व्यापारी यांच्यात मंगळवारी (दि. ५) झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत होऊन व्यापाऱ्याला मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तालुक्यात याची एकच चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत कॅम्प पोलिसांत कुणीही तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही. शेतकरी व व्यापाऱ्यांना बोलावल्याचे पोलिसांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील शेतकरी दिलीप पवार रा. वसंतवाडी यांना मारहाण केल्याची तक्रार बाजार समितीकडे केली आहे. बाजार समितीचे सचिव अशोक देसले यांनी संंबंधित व्यापाऱ्याला नोटीस बजावली असून, सात दिवसांच्या आत खुलासा मागितला आहे. खुलासा समाधानकारक न वाटल्यास कृऊबाचा गाळा ताब्यात घेऊन परवाना रद्द करण्यात येणार आहे. दरम्यान, याबाबत कॅम्प पोलिसांत कोणीही तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.