मालेगावी आदेश मोडणाऱ्या शाळेला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:15 AM2021-04-07T04:15:50+5:302021-04-07T04:15:50+5:30
शहरातील नयापुरा भागातील एका शाळेमध्ये कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करून वर्ग सुरू होते. याची माहिती महापालिकेच्या ...
शहरातील नयापुरा भागातील एका शाळेमध्ये कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करून वर्ग सुरू होते. याची माहिती महापालिकेच्या पथकाला व आझादनगर पोलीस ठाण्याला मिळतात. पथकाने दुपारी तेथे जाऊन तपासणी केली. शाळेमध्ये पथक दाखल होताच शिक्षक, विद्यार्थिनी व व्यवस्थापनाने तेथून पळ काढला. यानंतर पथकाने महाविद्यालयाला तीन हजार रुपये दंड केला. वरिष्ठ लिपिक अन्सारी रईस अहमद अब्दुल अहमद यांनी दंडाची रक्कम भरली आहे.
याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौसिफ अहमद इम्तियाज अहमद, अबू ओसामा अब्दुल रशीद, जाकिया अब्दुल रशीद अन्सारी, मोहमद सिद्दीकी मो इस्माईल आणि रईस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक पाडवी करीत आहेत.
===Photopath===
060421\06nsk_55_06042021_13.jpg
===Caption===
मालेगाव गर्ल्स हायस्कूल वर दांडात्मक कारवाई करतांना मनपा व पोलीस विभागाचे पथक