मालेगावी ‘अन्न सावली’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:16 AM2021-09-22T04:16:05+5:302021-09-22T04:16:05+5:30
------------------------------------ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप मालेगाव : तालुक्यातील देवघट येथील एन्जॉय ग्रुपतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ...
------------------------------------
स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप
मालेगाव : तालुक्यातील देवघट येथील एन्जॉय ग्रुपतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये ५ ते १५ वर्ष वयोगटांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली. या बक्षीस वितरण कार्यक्रमास तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, सेनेचे अजिंक्य भुसे, भाजपचे लकी गिल, ज्ञानेश्वर कांदे, किसन गांगुर्डे आदींसह ग्रामस्थ, ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.
----------------------------------
मालेगाव परिसरात रिमझिम पाऊस
मालेगाव : शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. सोमवारी (दि.२०) शहर व तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसानंतर पावसाने उसंत घेतली होती; मात्र पुन्हा ढगाळ व पावसाळी वातावरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. हातातोंडाशी आलेला खरीप हंगामातील घास अस्मानी संकटामुळे हिरावून नेण्याची शक्यता आहे. पावसाने उघडीप दिल्यास खरीप पिकांच्या कापणीस सुरुवात होणार आहे.
-------------------------------
अन्न सुरक्षा अभियानाबाबत आवाहन
मालेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पीक प्रात्यक्षिकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी केले आहे. शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. शेतकऱ्यांनी पिकाचे नाव, प्रकल्प क्षेत्र व इतर माहिती अर्जासोबत देऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.