मालेगावी हनुमान जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 10:10 PM2021-04-27T22:10:26+5:302021-04-28T00:42:33+5:30
मालेगाव कॅम्प :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक विधी करून साधेपणाने साजरा करण्यात आला.
मालेगाव कॅम्प :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक विधी करून साधेपणाने साजरा करण्यात आला.
शहरातील दाभाडी जवळचे रोकडोबा हनुमान मंदिर, कॅम्प येथील स्मशान मारूती मंदिर, किल्ला हनुमान, काटे हनुमान मंदिरासह इतर अनेक मंदिरात हनुमान जयंती उत्सवा निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सर्व मंदिरासह मुख्यते कॅम्प येथील पुरातन स्मशान मारूती मंदिरात पहाटे महंत धर्मदास महाराज यांच्या हस्ते मुख्य पूजन करण्यात आले. मंदिर गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. मारूती रायाला छप्पन भोग प्रसाद ठेवण्यात आला. पहाटे भाविकांनी काकड आरती केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची संख्या दर्शनासाठी अल्प प्रमाणात होती. तरी भाविकांमध्ये उत्साह दिसून आला. स्मशान मारूती मंदिरात भक्त मंडळाने सकाळी व सायंकाळी सुंदरकांड श्लोक म्हटला. धणे, साखर, फुटाणे मिश्रीत पंजरी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
शहरातील अनेक मंदिरात हनुमान जयंती पारंपरिक पद्धतीने कोरोना नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. भाविकांची मोजकीच उपस्थिती होती.
- महंत धर्मदास महाराज, मुख्य पुजारी, स्मशान मारूती मंदिर