मालेगावी उष्णतेचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:14 AM2021-03-08T04:14:35+5:302021-03-08T04:14:35+5:30

पाणी पुरवठ्यात विजेची अडचण मालेगाव: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरण पाणीपुरवठा योजनेत वीज वितरण कंपनीकडून वारंवार कमी अधिक ...

Malegaon heatwave | मालेगावी उष्णतेचा कहर

मालेगावी उष्णतेचा कहर

Next

पाणी पुरवठ्यात विजेची अडचण

मालेगाव: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरण पाणीपुरवठा योजनेत वीज वितरण कंपनीकडून वारंवार कमी अधिक दाबाने वीजपुरवठा होत असल्याने अनेकदा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. काही दिवसांपूर्वी महिनाभर वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम करण्यात आले. परंतु तरीही कमी अधिक दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पाणी पुुरवठ्यात अडचण येत असल्याचे सांगण्यात आले.

कचरा कुंडीतच जाळल्याने दुर्गंधी

मालेगाव: तालुक्यातील झोडगे येथे कचरा विलगीकरणाची प्रक्रिया न करता कुंडीतच कचरा जाळण्यात येत असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधितांनी कचरा विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गावातून गोळा होणारा कचरा विलगीकरणाची सोय नाही.कचरा कुंडीतच साचून ओसंडून रस्त्यावर वाहत आहे. कधी कधी कुंडीतच कचऱ्याला आग लावली जाते.

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

मालेगाव : तालुक्यातील दहिदी येथे ऋषीकेश बुवाजी दळवी (२८) या तरुणाने आपल्या राहत्या घरात शनिवारी (दि. ६) सकाळी ७ वाजेच्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पाेलीस नाईक बच्छाव करीत आहेत.

Web Title: Malegaon heatwave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.