गाफील यंत्रणेमुळे मालेगाव हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 08:33 PM2020-04-30T20:33:03+5:302020-04-30T23:26:42+5:30
नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव शहर व तालुक्यातील कोरोनाबधितांचा आकडा दिवसांत २५८ वर जाऊन पोहोचला असून, आतापर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे.
नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव शहर व तालुक्यातील कोरोनाबधितांचा आकडा दिवसांत २५८ वर जाऊन पोहोचला असून, आतापर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन घोषित केल्यानंतरही गाफील राहिलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून, गेल्या तीन-चार दिवसांत बाधितांचा आकडा वाढतच चालल्याने परिस्थिती आणखी चिघळत चालली आहे. त्यामुळे आता खांदेपालट करत सरकारही सतर्क झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी २३ मार्चला लॉकडाउन घोषित केल्यानंतर नाशिक जिल्ह्यात २९ एप्रिल रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण निफाड तालुक्यात आढळून आला होता. त्यापाठोपाठ नाशिक शहरात एका रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर ८ एप्रिल रोजी मालेगावमध्ये एकाच वेळी ५ रुग्ण कोरोनाबाधित आढळले तर पहिला बळीही मालेगावच्याच बाधित रुग्णाचा गेला. ८ ते २९ एप्रिल या २२ दिवसांच्या कालावधीत तब्बल २५८ बाधित रुग्ण आढळून आले असून, कोरोनाने १२ जणांचा बळी घेतला आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर दिल्लीतील कार्यक्रमांशी कनेक्शन असलेल्या लोकांना तात्काळ क्वॉरण्टाइन करण्याची प्रक्रिया राबविण्याबाबत प्रशासकीय यंत्रणा गाफील राहिली. त्यामुळे आता सद्यस्थितीत त्याचा उद्रेक मालेगावमध्ये पाहायला मिळतो आहे.
इन्फोलॅब सुविधेमुळे चाचण्या जलद जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने प्रारंभी पुणे येथे लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले जात होते. त्यानंतर शासनाने धुळे येथे लॅब कार्यान्वित केली. आता नाशिकलाच मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात लॅबची सोय झाली असून, एका दिवसात १८०हून अधिक तपासणी अहवाल प्राप्त होत आहेत. या जलद तपासणीमुळेही आता मालेगावमधील वाढता प्रसार समोर येत आहे.
--------------
शासनालाही उशिराने शहाणपण सुचले आणि अपर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, आरोग्याधिकारी यांच्या उचलबांगड्या करण्याची नामुष्की ओढवली. दाट लोकवस्तीतील लोकांशी सुसंवाद साधत त्यांच्यात कोरोनाबाबत जागृती करण्यातही यंत्रणा कमी पडली. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मालेगाव आता हॉटस्पॉट तर बनले आहेच शिवाय मुंबई, पुण्यापाठोपाठ हिटलिस्टमध्येही आले आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी जिल्हा दौरा करत यंत्रणा हलवली आहे, त्यामुळे कोरोनाची बाधा काहीअंशी कमी होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. शासनालाही उशिराने शहाणपण सुचले आणि अपर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, आरोग्याधिकारी यांच्या उचलबांगड्या करण्याची नामुष्की ओढवली. दाट लोकवस्तीतील लोकांशी सुसंवाद साधत त्यांच्यात कोरोनाबाबत जागृती करण्यातही यंत्रणा कमी पडली. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मालेगाव आता हॉटस्पॉट तर बनले आहेच शिवाय मुंबई, पुण्यापाठोपाठ हिटलिस्टमध्येही आले आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी जिल्हा दौरा करत यंत्रणा हलवली आहे, त्यामुळे कोरोनाची बाधा काहीअंशी कमी होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.