आपद्ग्रस्त कुटुंबीयांना मालेगाव जैन संघटनेची मदत
By Admin | Published: February 9, 2017 12:26 AM2017-02-09T00:26:15+5:302017-02-09T00:26:26+5:30
आपद्ग्रस्त कुटुंबीयांना मालेगाव जैन संघटनेची मदत
मालेगाव कॅम्प : तालुक्यातील पोहाणे येथील मजुरी करणाऱ्या दोन कुटुंबीयांच्या झोपड्या आगीत भस्मसात झाल्या. त्या कुटुंबीयांना मालेगावच्या भारतीय जैन
संघटनेच्या वतीने मदत करण्यात आली.
पोहाणे चटाणेपाडा येथील मोलमजुरी करणारे आनंद अहिरे व पिंटू सोनवणे यांच्या राहत्या झोपड्यांना अचानक आग लागली व काहीवेळातच त्या आगीत दोन्ही झोपट्या भस्म झाल्या. यात जीवनावश्यक वस्तू, धान्य, कपडे व इतर संसारोपयोगी साहित्य सामान जळून खाक झाले होते.
मालेगाव भारतीय जैन संघटनेच्या वतीने या आपद्ग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.
यावेळी जैन संघटनेचे अॅड. बालचंद छाजेड यांनी सांगितले की, संघटनेच्या वतीने वेळोवेळी
अशा पीडित नागरिकांना मदत करण्यात येते. यात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील गरजवंतांना मदतीचा हात पुढे करण्यात येतो. यावेळी जैन संघटनांचे घेवरचंद कांकरिया, अनिल खिंवसरा, नंदलाल कवाड, हिरालाल मुथा, शांतीलाल बाफना, प्रकाशचंद, रा. सुराणा, बिपीन लोढा, राजकुमार सोनी, कांतीलाल जैन, प्रेमसुख चोरडिया, सरपंच दिनेशसिंग बागुल, तलाठी एम. बी. गायकेसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)