मालेगावी अल्पवयीन मुलीला पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 00:16 IST2021-08-03T00:15:49+5:302021-08-03T00:16:12+5:30
मालेगाव : तालुक्यातील अजूनदे येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या अज्ञात इसमाविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगावी अल्पवयीन मुलीला पळविले
मालेगाव : तालुक्यातील अजूनदे येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या अज्ञात इसमाविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या सोळा वर्षांच्या मुलीला अज्ञात इसमाने आमिष दाखवून पळवून नेले आहे. पुढील तपास हवालदार गुजर हे करीत आहेत.
दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार
मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे शिवारातील गलाठी नदी पुलावर अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बबन शामराव पवार (५२, रा. सौंदाणे) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी राहुल लक्ष्मण सूर्यवंशी यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकी क्रमांक एमएच ४१ एएल २४१७ वरील चालकाने मालेगावकडून नाशिककडे जात असताना बबन पवार यांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार तिडके करीत आहेत.