मालेगाव कृऊबा संचालक मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:15 AM2021-02-24T04:15:24+5:302021-02-24T04:15:24+5:30
समितीच्या संचालक मंडळाची मुदत १० मार्चला संपणार होती. कोरोनामुळे संचालक मंडळाला १० सप्टेंबरपर्यंत कामकाज करता येणार आहे. सहकार, पणन ...
समितीच्या संचालक मंडळाची मुदत १० मार्चला संपणार होती. कोरोनामुळे संचालक मंडळाला १० सप्टेंबरपर्यंत कामकाज करता येणार आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी मुदतवाढीचे पत्र समितीच्या सचिव अशोक देसले यांनी दिली आहे.
बाजार समितीत कृषिमंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांची सत्ता आहे. सभापतीपदी राजेंद्र जाधव, तर उपसभापती म्हणून सुनील देवरे कामकाज पाहत आहेत. शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्ण संचालक मंडळाने निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव बैठकीत मंजूर केला होता. विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव पणन सभापती संचालकांनी शासनाला सादर केलेला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यांचे सर्वत्र अंमलबजावणी सुरू आहे.
कोरोनामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढीचे समितीचे सभापती राजेंद्र जाधव उपसभापती सुनील देवरे वेळी संचालक संग्राम बच्छाव, संजय घोडके, गोरख पवार, विश्वनाथ निकम व सचिव अशोक देसले यांनी स्वागत केले आहे.