मालेगाव कृउबा : मुंगसे, झोडगे येथील व्यापाऱ्यांची बैठक; परवाने नूतनीकरण प्रक्रिया बॅँक गॅरंटी न देणारे व्यापारी राहणार लिलावापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:22 AM2018-05-05T00:22:00+5:302018-05-05T00:22:00+5:30
मालेगाव : परवाना नूतनीकरण प्रक्रियेत आर्थिक सुरक्षिततेसाठी बँक गॅरंटी न देणाºया एकाही व्यापाºयाला शेतमाल लिलावात सहभाग घेऊ दिला जाणार नसल्याचा निर्णय बाजार समितीच्या पदाधिकारी व प्रशासनाने घेतला आहे.
मालेगाव : परवाना नूतनीकरण प्रक्रियेत आर्थिक सुरक्षिततेसाठी बँक गॅरंटी न देणाºया एकाही व्यापाºयाला शेतमाल लिलावात सहभाग घेऊ दिला जाणार नसल्याचा निर्णय बाजार समितीच्या पदाधिकारी व प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान व्यापाºयांनी या प्रश्नी सकारात्मक भूमिका घेत शेतकरी हिताच्या या निर्णयात सहभागी होण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. परवाना नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून बॅँक गॅरंटी न देणाºया व्यापाºयाला शेतमाल लिलावात सहभाग घेता येणार नाही. शेतकरी हितासाठी समितीने हा निर्णय घेतला आहे. व्यापाºयांना हा निर्णय बंधनकारक होणार असून, तसे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कांदा उत्पादकांचे पैसे थकविणाºया व्यापाºयांना पाठीशी घालण्यासह परवाना कायद्याचे उल्लंघन होत असल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी मालेगाव कृउबासह जिल्ह्यातील पाच बाजार समिती बरखास्त का करू नये, अशा नोटिसा बजावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंगसे व झोडगे येथील व्यापाºयांची व कृउबा पदाधिकाºयांची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत सभापती राजेंद्र जाधव यांनी बॅँक गॅरंटी न देणाºया व्यापाºयांना सहभाग घेता येणार नसल्याचे सांगितले. तसेच शेतकºयांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी व्यापाºयांकडून जागेवर समितीचे नाव लावण्यासाठी ३० लाखांची बँक गॅरंटी देण्याचे प्रत्येक व्यापाºयास बंधनकारक आहे. व्यापारी व जामीनदार यांनी पैसे न दिल्यास मालमत्ता विक्री करावी, अशी नोटरीसुद्धा करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बैठकीला उपस्थित व्यापाºयांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. समितीने घेतलेल्या निर्णयास मुंगसे व झोडगे येथील व्यापाºयांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती सभापती जाधव यांनी दिली. बँकांना सलग सुट्टी व तांत्रिक अडचणींमुळे कागदपत्रांची पूर्तता काही व्यापारी करू शकले नाहीत मात्र आगामी काळात बँक गॅरंटीसह इतर पूर्तता केली जाणार असल्याचे व्यापारी असोसिएशने भिका कोतकर यांनी सांगितले.