मालेगाव, लोणी, चाळीसगावच्या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांना 'मोक्का'; १६ गुन्हेगारांना खाकी पोलिसांचा दणका
By अझहर शेख | Published: April 16, 2024 06:03 PM2024-04-16T18:03:33+5:302024-04-16T18:04:01+5:30
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नाशिक शहर पोलिसांसह नाशिक परिक्षेत्रातील पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडून नाशिक परिक्षेत्रातील मालेगाव, लोणी, चाळीसगाव भागांतील सराईत गुन्हेगार, जे संघटितपणे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत सक्रिय होते, अशा १६ गुन्हेगारांवर विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी ‘मोक्का’ची कारवाई केली आहे. या गुन्हेगारांना आता कारागृहाची वाट दाखविली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नाशिक शहर पोलिसांसह नाशिक परिक्षेत्रातील पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे.
नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये संघटितपणे टोळीने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या, पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुद्ध संबंधित अधीक्षक कार्यालयाकडून मोक्का कारवाईबाबतचे प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाने मागविले आहेत. या प्रस्तावांचे अवलोकन करून ‘मोक्का’ची कारवाई लागू करण्यात येत असल्याचे शेखर-पाटील यांनी सांगितले. यानुसार मालेगाव, लोणी, चाळीसगावमधील प्रत्येकी एक अशा तीन टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला आहे. यामधील एकूण १६ सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. यामुळे निवडणुकीच्या कालावधीत नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी नाशिक परिक्षेत्र कार्यालयाकडून वरील सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षक कार्यालयांना सतर्कतेच्या सूचना देत प्रतिबंधात्मक कारवायांना वेग देण्याचे आदेश दिले आहेत.
अशा आहेत मोक्कामधील टोळ्या...
चाळीसगाव टोळी- टोळीप्रमुख- सुमीत उर्फ सुमेध उर्फ बाबा उर्फ सरकार भोसले, उद्देश उर्फ गुड्डु शिंदे (रा.हिरापुर), सचिन गायकवाड (२३,रा.प्रभातगल्ली), अनिस उर्फ नव्वा शेख (२३,रा.हुडको कॉलनी),शाम उर्फ सॅम नामदेव चव्हाण (रा.हिरापुर), संतोष उर्फ संता पहेलवान रमेश निकुंभ (रा.हिरापुर), भुषण मच्छिंद्रनाथ अहेर (रा.न्यायडोंगरी), सावन मनसुब उग्रेजिया (रा.सिंधी कॉलनी) यापैकी सुमीत, गुड्डु, सॅम, भुषण आणि संता हे फरार असून ते पोलिसांना हवे आहेत. या टोळीवर खून, प्राणघातक हल्ले यांसारखे विविध गंभीर गुन्हे आहेत.
लोणीची टोळी - टोळीप्रमुख- अमर बाळु भोसले (२३, रा.प्रवरानगर), अनिकेत देवेंद्र उर्फ जया भोसले (२१), ऋषिकेश उर्फ भैया बाबासाहेब सरोदे (२३), आदित्य बाळासाहेब गायकवाड (२०), मयूर उर्फ अनिकेत विठ्ठल अल्हाट(२० सर्व रा.आहेरवस्ती),
-मालेगावची टोळी -टोळीप्रमुख- मोहंमद युसुफ याकूब उर्फ भुऱ्या (३६,रा.पवारवाडी, शरजील अहमद रफिक अहमद (२६,रा.अस्माबाग), अब्दुल मुस्सवीर इरशाद अहमद (२४,रा.मुस्लीमनगर),