मालेगावी महाशिवरात्री उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:25 AM2021-03-13T04:25:10+5:302021-03-13T04:25:10+5:30
शहरातील मुख्यत्वे गणेश कुंडाजवळील महादेव घाट येथील सरदार नारोशंकर राजेबहाद्दर महादेव मंदिरात सकाळी महादेव सेवा समितीच्या सदस्यांनी मंदिर ...
शहरातील मुख्यत्वे गणेश कुंडाजवळील महादेव घाट येथील सरदार नारोशंकर राजेबहाद्दर महादेव मंदिरात सकाळी महादेव सेवा समितीच्या सदस्यांनी मंदिर गाभाऱ्यातील पिंडीचे व प्रतिमेच्या पूजनासह इतर धार्मिक विधी केले. महाशिवरात्रीनिमित्त समितीतर्फे कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात आली. भक्तांना सॅनिटायझर लावून व मास्क लावून व योग्य शारीरिक अंतर ठेवून मंदिरात प्रवेश दिला जात होता. मंदिर परिसरात अल्प गर्दी होती तरीही सर्व नियम पाळले जात होते, तर समितीचे सदस्य वारंवार भक्तांना याबाबत आवाहन करीत होते. सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मंदिर महादेव भक्तांसाठी खुले ठेवण्यात आले होते. दिवसभरात कमीअधिक गर्दी बघायला मिळाली. बम बम भोले, ओम नम: शिवाय उच्चारांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. शहरातील संगमेश्वर येथील महादेव मंदिर, सोयगाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर, चंदनपुरीजवळच असलेले मडकी महादेव मंदिरांसह काही मंदिरात मुख्य पूजन, धार्मिक विधीसह भजन, कीर्तन करीत महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.