मालेगावची मका खरेदी योजना अडकली वादाच्या भोवºयात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 10:52 PM2020-06-23T22:52:07+5:302020-06-23T22:52:40+5:30
मालेगाव : प्रशासनाचे असहकार्य, बारदानाचा अभाव तसेच शेतकी संघाचे व्यवस्थापक, सेवक यांच्या नियोजनाअभावी येथील मका खरेदी योजना प्रारंभापासून वादाच्या भोवºयात सापडली असून, त्यामुळे शेतकºयांची हेळसांड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : प्रशासनाचे असहकार्य, बारदानाचा अभाव तसेच शेतकी संघाचे व्यवस्थापक, सेवक यांच्या नियोजनाअभावी येथील मका खरेदी योजना प्रारंभापासून वादाच्या भोवºयात सापडली असून, त्यामुळे शेतकºयांची हेळसांड झाली आहे.
दीड महिन्यापेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करूनही अनेक शेतकºयांचा मका मोजला गेला नाही. शिवाय तालुक्यात केंद्र शासनाची
किमान आधारभूत किंमत भरडधान्य खरेदी योजना बंद झाली. या कुचकामी योजनेमुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकºयांना आर्थिक डबघाईस सामोरे जावे लागत
आहे.उघड्यावर पडलेल्या मक्याचे नुकसानशेतकरीहिताच्या योजना तत्काळ राबवल्या जात नसल्याने सर्वसामान्य शेतकरी हतबल झाला आहे. निसर्गाचा प्रकोप, कोरोनाचे सावट अशा चक्रव्यूहात सापडलेला बळीराजा धास्तावला आहे. शासनाने योजनेची घोषणा केली नसती तर शेतकºयांनी मिळेल त्या दरात मका विक्री केली असती. आज मोजणी होईल, उद्या होईल या आशेवर बळीराजा होता; मात्र दररोज फक्त आठ ते दहा शेतकºयांचा मका मोजला जात होता. एक पोते मका मोजण्यासाठी ३० रुपये वसूल केले जात होते, अशी कैफियत एका शेतकºयाने मांडली.
मका खरेदी होत नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांच्या जीवनाशी खेळ होत आहे. उघड्यावर पडलेला मकाचे अतोनात नुकसान होत आहे. पावसाने खराब होत चाललेल्या मका पिकाचे काय करावे, या समस्येने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. शेतकºयांची अवस्था चिंताजनक असून, सुलतानी आणि अस्मानी दोन्ही संकटात सापडलेला शेतकरी भरडला जात आहे.आर्थिक कोंडीकोरोना पार्श्वभूमीमुळे लॉकडाऊनच्या काळात लिलाव बंद होते. माल विकला जात नाही. शेतकरी मरणयातना भोगत असताना शेतमाल विकला जात नव्हता. तसेच शेतकºयाची आर्थिक कोंडी झाली असताना शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शेतकºयांसाठी असलेला योजना राबवण्याचे काम प्रभावीपणे न करता अडथळे निर्माण होत आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करण्याची मागणी होत आहे.योजना यशस्वी करण्यासाठी नियोजन व इच्छाशक्तीची आवश्यकता होती. मात्र मका मोजणीसाठी शेतकºयांना अतोनात त्रास सहन करावा लागला. तीन-चार दिवस नंबर लावून थांबण्याची दुर्दैवी वेळ बळीराजावर आली. मका मोजणी योजनेचा संपूर्ण बोजवारा उडाला आहे. खुल्या बाजारात १३०० पर्यंत दर मिळतो आहे. ५०० रुपये जास्त दर मिळेल या अपेक्षेने शेतकरी हतबल झाला आहे. इतक्या वेळखाऊ आणि त्रासदायक योजना नको असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे.