मालेगाव मनपातर्फेआठ फवारणी यंत्रांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:31 PM2020-04-06T17:31:04+5:302020-04-06T17:36:06+5:30

मालेगाव मध्य : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मनपाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या आठ फवारणी यंत्राचे आज दुपारी महापौर ताहेरा शेख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

Malegaon Mantra inaugurates eight spraying machines | मालेगाव मनपातर्फेआठ फवारणी यंत्रांचे लोकार्पण

मालेगाव मनपातर्फेआठ फवारणी यंत्रांचे लोकार्पण

Next
ठळक मुद्दे प्रशासनातर्फेसर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे.

मालेगाव मध्य : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मनपाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या आठ फवारणी यंत्राचे आज दुपारी महापौर ताहेरा शेख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी उप महापौर निलेश अिहरे, मनपाच्या आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस स्थायी समतिी सभापती डॉ.खालीद परवेज, माजी महापौर रशीद शेख, विरोधीपक्षनेते अतिक कमाल उपस्थित होते.
देशात कोरोनाने आपले पाय पसरले आहे. त्यातच राज्यात सर्वाधिक करणाचे रु ग्ण आढळून येत आहेत. आज पर्यंत शहरात एकही कोरोनाचा रु ग्ण आढळून आला नसला तरी खबरदारी म्हणून प्रशासनातर्फेसर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे. मनपाच्या स्वच्छता विभागाच्यावतीने ट्रॅक्टरच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी केली जात होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व शहराचा विस्तार पाहता ही यंत्रणा अपुरी पडत असल्याने मनपाच्या वतीने आठ लहान फवारणी यंत्रे खरेदी करण्यात आली. प्रत्येक प्रभागास दोन यंत्रांची विभागणी केली असुन यामुळे शहरातील गल्ली बोळात ही फवारणी करणे सोयीस्कर होणार आहे. २०० लिटर पाण्यात ३०० मि. ली. सोडियम हायपो क्लोराईड औषध मिश्रीत करून फवारणी केली जाणार आहे.
आज पर्यंत शहरात एकही कोरोनाचा रु ग्ण आढळून आलेला नसला तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता मनपाच्या वतीने वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करु न शहर कोरोनामुक्त राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर ताहेरा शेख व मनपा आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांनी केले आहे. 

Web Title: Malegaon Mantra inaugurates eight spraying machines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.