मालेगावी झेंडूच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 09:29 PM2021-10-14T21:29:44+5:302021-10-14T21:31:53+5:30
मालेगाव : पूजेसाठी लागणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी महिलांसह नागरिकांनी बाजारात गर्दी केल्याने मोसम पूल परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. यंदा झेंडूच्या फुलांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
मालेगाव : विजयादशमीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (दि.१४) सायंकाळी मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले बाजारात विक्रीसाठी आली होती. शहरातील मोसम पूल, सटाणा नाका व कॅम्प भागात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने विविध प्रकारची झेंडूची फुले विक्रीसाठी आणली. पूजेसाठी लागणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी महिलांसह नागरिकांनी बाजारात गर्दी केल्याने मोसम पूल परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
यंदा झेंडूच्या फुलांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे नागरिकांनी सांगितले. ६० रुपये ते १०० रुपये शेकडा दराने झेंडूची फुले विकली जात होती. झेंडूच्या तयार माळा ३० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत विकल्या जात होत्या. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी दसरा मैदान येथे रावण दहनासाठी ५० जणांना पास देण्यात आले असून कोरोनाचे नियम पाळत रावण दहन केले जाणार आहे.