मालेगाव : बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांसह आबालवृद्धांची गर्दी ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:08 AM2018-06-01T01:08:57+5:302018-06-01T01:08:57+5:30
मालेगाव : रमजान सण पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असताना मुस्लिम बांधवांच्ी शहरातील किदवाई रस्त्यावर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असून सायंकाळच्यावेळी गर्दीने बाजारपेठ फुलून जात आहे.
ंमालेगाव : रमजान सण पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असताना मुस्लिम बांधवांच्ी शहरातील किदवाई रस्त्यावर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असून सायंकाळच्यावेळी गर्दीने बाजारपेठ फुलून जात आहे. शहरातील किदवाई रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत महिलांसह आबालवृद्धांची वर्दळ वाढली आहे. यंत्रमाग व्यवसायावर आलेली मंदीचा परिणाम या सणाच्या खरेदीवर काहीअंशी जाणवत आहे. बहुतांश ग्रामीण भागातील मुस्लीम बांधव रमजानच्या खरेदीसाठी मालेगावी येतात. त्यात बागलाण, नांदगाव, मनमाड, चांदवड, देवळा भागातील मुस्लीम वर्गाचा समावेश असतो.
गेल्या महिनाभरापासून रमजान महिन्याचे उपवास सुरू आहेत. शहरातील किदवाई रस्ता, मोहंमद अली रस्ता, कुसूंबा रस्ता, अंजुमन चौक, बापू गांधी मार्केट, आझादनगर मार्केट, सोनिया गांधी मार्केट आदी ठिकाणी बाजारात गर्दी होत आहे. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत महिला पुरुषांपासून लहान मुलांचीही बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाल्याने बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. आयशानगरातील बाजारपेठेत रात्रीच्या वेळेत खरेदीसाठी झुंबड होत आहे. शहरात असलेल्या महिलांच्या बाजारात रात्री आठनंतर महिला खरेदीसाठी बाहेर पडताना दिसत आहेत.
रमजानच्या पार्श्वभूमीवर लुंगी, टोप्या, हातरुमाल, स्त्री- पुरुष- लहान मुले आदींचे तयार कपडे, पादत्राणे, शिरखुर्म्यासाठी लागणारे शेवया व सुकामेवासहित विविध खाद्यपदार्थांचे साहित्य, विविध प्रकारचे सुंगधी अत्तर, चष्मे आणि लहान मुलांची खेळणी आदी वस्तुंनी दुकाने थाटण्यात आली आहेत. रमजानचा रोजा सोडण्यासाठी लागणाऱ्या नानसह, शेवया, विविध खाद्यपदार्थांची रोज दुपारी खरेदी केली जाते. रमजानची नमाज पठण केले जाते. वाढत्या महागाईसोबत या वस्तुंच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. ठिकठिकाणी असलेल्या मशिदींमध्ये नमाजसाठी गर्दी होत असून मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.