मालेगाव महापौर-उपमहापौरांची उद्या निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 01:02 PM2019-12-11T13:02:07+5:302019-12-11T13:02:19+5:30

मालेगाव : महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख व उपमहापौरपदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड निश्चित झाली आहे. उद्या गुरूवारी (दि. १२) रोजी महापालिकेच्या सभागृहात महापौर - उपमहापौरांची निवडीची अधिकृतरित्या घोषणा केली जाणार आहे. या औपचारिक निवडीकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.

 Malegaon Mayor-Deputy Mayor to be elected tomorrow | मालेगाव महापौर-उपमहापौरांची उद्या निवड

मालेगाव महापौर-उपमहापौरांची उद्या निवड

googlenewsNext

मालेगाव : महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख व उपमहापौरपदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड निश्चित झाली आहे. उद्या गुरूवारी (दि. १२) रोजी महापालिकेच्या सभागृहात महापौर - उपमहापौरांची निवडीची अधिकृतरित्या घोषणा केली जाणार आहे. या औपचारिक निवडीकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.
गुरूवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एस. भुवनेश्वरी उपस्थित राहणार आहेत. त्यांना मनपा आयुक्त किशोर बोर्डे, नगरसचिव राजेश धसे सहाय्य करणार आहेत. महापालिकेत पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेना व काँग्रेसची सत्ता येणार आहे. काँग्रेसकडे २९ तर शिवसेनेकडे १३ सदस्य आहेत. भाजपाच्या ९ सदस्यांचेही बळ मिळाल्याने काँग्रेस - सेना - भाजपचे सभागृहातील संख्याबळ ५१ झाले आहे. तर महागठबंधन आघाडीकडे व एमआयएमकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे निवडणुकीतील चुरस राहिलेली नाही. काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार ताहेरा शेख यांच्या विरोधात महागठबंधन आघाडीच्या शान-ए-हिंद, एमआयएमच्या सादिया लईक हाजी यांनी महापौर पदासाठी नामांकन अर्ज भरला आहे. तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे निलेश आहेर यांच्या विरोधात महागठबंधन आघाडीचे अन्सारी अमानतुल्ला पीरमोहंमद, एमआयएमचे शेख माजीद मो. युनुस यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. सभागृहात होणाऱ्या या तिरंगी लढतीकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे. महापालिकेच्या नगरविकास विभागाने महापौर, उपमहापौर निवडणूक प्रक्रियेची तयारी पूर्ण केली आहे. निवडणूक काळात महापालिका परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. महापालिकेसमोरील रस्ता लोखंडी जाळ्या लावून अडविण्यात येणार आहे.

Web Title:  Malegaon Mayor-Deputy Mayor to be elected tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक