मालेगाव महापौरपदाची १२ रोजी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 12:30 AM2019-12-05T00:30:40+5:302019-12-05T00:31:24+5:30
मालेगाव : मालेगाव महापालिका महापौरपदाची निवडणूक १२ डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
मालेगाव : मालेगाव महापालिका महापौरपदाची निवडणूक १२ डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महापौर रशीद शेख यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ १५ रोजी संपत आहे. तत्पूर्वी ही निवडणूक होणार आहे. महापौरपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. सध्या शिवसेना व काँग्रेसची महापालिकेत सत्ता आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या सत्ता पॅटर्न यापूर्वीच मालेगाव महापालिकेत राबविण्यात आला आहे. काँग्रेसकडून शिवसेना व काँग्रेसचे संख्याबळ पाहता त्यांच्याकडेच पुन्हा महापौर पदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे. निवडणूक १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी राहणार आहेत.