मालेगाव महापौरांच्या दिराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 11:33 PM2019-12-12T23:33:51+5:302019-12-13T00:32:09+5:30

महागठबंधनचे नगरसेवक एजाज बेग यांच्या घराच्या पार्किंगमध्ये घुसून फटाके फोडले व शिवीगाळ केल्याप्रकरणी जलील शेख व इतर १० ते १२ जणांविरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नगरसेवक यास्मीनबानो एजाज बेग यांनी फिर्याद दिली.

Malegaon Mayor files a complaint against the mayor | मालेगाव महापौरांच्या दिराविरुद्ध गुन्हा दाखल

मालेगावी महागठबंधन आघाडीच्या नगरसेविकेला काँग्रेस समर्थकांनी शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ आझादनगर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करताना महागठबंधन आघाडीच्या गटनेत्या शान-ए-हिंद, नगरसेवक मोहंमद आमीन, लईक हाजी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते.

Next
ठळक मुद्देमहापौर निवडणूक : महागठबंधन आघाडीच्या नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

मालेगाव मध्य : महागठबंधनचे नगरसेवक एजाज बेग यांच्या घराच्या पार्किंगमध्ये घुसून फटाके फोडले व शिवीगाळ केल्याप्रकरणी जलील शेख व इतर १० ते १२ जणांविरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नगरसेवक यास्मीनबानो एजाज बेग यांनी फिर्याद दिली. घटनेनंतर महागठबंधनच्या नगरसेविकांनी शान-ए-हिंद यांच्या नेतृत्वाखाली आझादनगर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिला.
मनपाच्या महापौरपदी ताहेरा शेख यांची निवड झाल्याने काँग्रेसच्या वतीने शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक खयबान-ए-निशात चौक, चंदनपुरी गेट मार्गे अमन चौकात आली असता महापौर ताहेरा शेख यांचे दिर जलील शेख, एहसान, हारुन बेग, अर्शद लईक अली व इतर १० ते १२ जणांनी नगरसेवक एजाज बेग यांच्या इस्लामनगर येथील निवासस्थानाच्या पार्किंगमध्ये घुसून फटाके फोडले. यावेळी नगरसेवक यास्मीनबानो एजाज बेग या ‘तुम फटाके घर के अंदर क्यू फोड रहे हो, घर के
बाहर जाओ’ असे सांगण्यास गेली असता संशयितांनी फिर्यादीस धक्काबुक्की करून अश्लील शिवीगाळ केली, असे यास्मीनबानो यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले
आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच महागठबंधनच्या गटनेत्या शान-ए-हिंद यांच्या नेतृत्वाखाली आझादनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.
यावेळी महिला नगरसेविकेस शिवीगाळ केल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर यांनी धाव घेत नगरसेविकांची समजूत काढत निष्पक्ष कारवाई
करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी परिसरात काही काळ तणाव पसरला होता. पोलिसांनी गांभीर्य परिस्थितीचे ओळखत बंदोबस्त तैनात केला.
खबरदारीचा उपाय
महागठबंधन आघाडीचे नगरसेवक अतिक अहमद कमाल अहमद यांच्यासह नगरसेविका जकीयाबी नजीरूद्दीन व सायराबानो शाहीद अहमद या दोन नगरसेविकांनी आम्ही राष्टÑवादीत असल्याची भूमिका महापौर निवडणुकीपूर्वी घेत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र ऐनवेळेस सभागृहात महागठबंधनच्या उमेदवार शान-ए-हिंद यांना मतदान केले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नगरसेवक अतिक कमाल यांच्या निवासस्थानी बंदोबस्त तैनात केला आहे.

Web Title: Malegaon Mayor files a complaint against the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.