मालेगाव : सामाजिक सलोखा वाढीसाठी संघटना बळकट करणार खान्देशस्तरीय राष्टÑ सेवा दल कार्यकर्त्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:10 AM2018-04-02T00:10:52+5:302018-04-02T00:10:52+5:30
मालेगाव : खान्देशस्तरीय राष्टÑ सेवा दल कार्यकर्त्यांची बैठक कॅम्पातील रेवा बागमध्ये राष्टÑीय व राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली.
मालेगाव : खान्देशस्तरीय राष्टÑ सेवा दल कार्यकर्त्यांची बैठक कॅम्पातील रेवा बागमध्ये राष्टÑीय व राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. प्रास्ताविक राज्य सचिव नचिकेत कोळपकर यांनी केले. सामाजिक सलोखा वाढीसाठी सेवा दल सदैव प्रयत्नशील असून, आगामी काळात संघटना अधिक बळकट करण्याची गरज आहे. यासाठी विविध उपक्रमांद्वारे सर्व घटकांपर्यंत पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन राष्टÑीय अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी यावेळी केले. उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी महाराष्टÑभर ठिकठिकाणी श्रमसंस्कार शिबिर घेण्यात येत असून १ ते ७ जुन दरम्यान पुणे येथे निवडक कार्यकर्त्यांचे अंतिम शिबिर होणार असल्याचे विनय सावंत यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार जयवंत ठाकरे, राज्य संघटक अल्लाउद्दीन शेख, प्रा. अरविंद कमोले, संजीव निकम, राजाभाऊ अवसक आदिंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चेत प्रवीण वाणी, दर्शना पवार, अॅड. भास्कर तिवारी, स्वाती वाणी, जयेश शेलार, डॉ. अपश्चिम बरंठ आदींनी सहभाग घेऊन विविध कामांची माहिती दिली. बैठकीस माजी नगराध्यक्ष साजेदा अहमद, सुनीता गांधी, मालेगाव तालुका संघटक संतोष पवार, कोषाध्यक्ष विकास मंडळ, अशोक फराटे, रविराज सोनार, अशोक पठाडे यांचेसह खान्देशातील मान्यवर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. संजय जोशी यांनी आभार मानले.