मालेगावी खासदारांनी घेतली खरीपपूर्व आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 10:11 PM2020-05-17T22:11:55+5:302020-05-18T00:13:27+5:30
मालेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी खरीपपूर्व आढावा बैठक घेतली.
मालेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी खरीपपूर्व आढावा बैठक घेतली.
जूनमध्ये मान्सूनची सुरुवात होत असून, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते वेळेवर मिळावी, पीक कर्ज शेतकºयांना वेळेवर मिळावे, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीस कृषी अधिकारी, प्रांत शर्मा व नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते. डॉ. भामरे यांनी कृषी अधिकाºयांकडून बियाणे, रासायनिक खते त्याचप्रमाणे बाजरी, मका, कांदे, कापूस यांचे क्षेत्र जाणून घेतले. तसेच पीक कर्जाविषयी अधिकाºयांना सूचना दिल्या.
मका पिकावर लष्करी अळीचा तसेच बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यातत्याविषयी सूचना दिल्यात. कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांना कुठलीही अडचण येऊ नये. पीकविम्यासंबंधी शेतकºयांना कुठलीही अडचण येऊ नये. शेतकºयांना मिळणारे अनुदान वितरित करून कुठलीही अडचण येऊ नये त्याबद्दलही त्यांनी सूचना दिल्या.
शेतकºयांना शासकीय अनुदान, कर्जमाफी मिळालेले शेतकरी ह्यांची खासदार डॉ. भामरे यांनी माहिती घेतली. बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, जि.प. सदस्य समाधान हिरे, लकी गिल, संदीप पाटील, हरिप्रसाद गुप्ता, नगरसेवक गजू देवरे, संजय काळे, देवा पाटील, डॉ. मिलिंद पवार, राहुल पाटील, संजय कन्नल, निखिल पवार पदाधिकारी उपस्थित होते.