बनावट पासपोर्टप्रकरणी मालेगाव मनपा कर्मचारी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:48 AM2020-11-11T00:48:03+5:302020-11-11T00:48:29+5:30

बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आयेशानगर पोलिसांनी अटक केलेल्या संशियतांना मंगळवारी न्यायालयाने पुन्हा सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

To Malegaon Municipal Corporation Employees | बनावट पासपोर्टप्रकरणी मालेगाव मनपा कर्मचारी बडतर्फ

बनावट पासपोर्टप्रकरणी मालेगाव मनपा कर्मचारी बडतर्फ

Next

मालेगाव मध्य : बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आयेशानगर पोलिसांनी अटक केलेल्या संशियतांना मंगळवारी न्यायालयाने पुन्हा सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बांगलादेशी नागरिकास जन्मदाखला बनविण्यासाठी मदत करणार्या मनपाच्या कर्मचार्यांला मनपा आयुक्त दीपक कासार यांनी बडतर्फ केले आहे. मनपा कर्मचारी ललित मराठे यास आयेशानगर पोलिसांनी गुरु वारी रात्री अटक केली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी मनपा आयुक्तांना पत्र दिले होते.
बांगलादेशातून घुसखोरी करून शहरात अवैधरितीने वास्तव्य करून बनावट दस्तावेजाच्या आधारे पासपोर्ट बनवून शासनाची फसवणूक करणार्या व त्यांना मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी बांगलादेशी नागरिकासह सात जणांना गुरु वारी रोजी अटक केली होती. त्यांना शुक्र वारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने व सोमवारी सायंकाळी एका मनपा कर्मचार्यासह जन्मदाखला बनविण्यासाठी मदत करणारा असे दोन जणांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी सर्व संशियतांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
बोगस दाखले बनविल्याचा संशय
पोलिसांनी आलम अमिन अन्सारी याच्या ताब्यातून त्याचा जन्मदाखला जप्त करण्यात आला होता. तो जन्मदाखला प्रभाग कार्यालय क्र मांक ? मधील जन्म-मृत्यू विभागात तत्कालीन संगणकचालक मानधन कर्मचारी व सद्य:स्थितीतील गॅरेज विभागातील मानधन वाहनचालक ललित नाना मराठे याने बोगस दाखले बनविले असल्याचा पोलिसांना संशय असल्याने त्याच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Web Title: To Malegaon Municipal Corporation Employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.